Nanded Politics
Nanded Politics Sarkarnama

Nanded Politics : नांदेड जिल्ह्यात भाजपात जोरदार इन्कमिंग; काँग्रेसच्या मुन्नासिंह तेहरांच्या हाती 'कमळ'

Munna Singh Tehara Join BJP : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यास भाजपने सुरुवात केली आहे.
Published on

Nanded News : नांदेड लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भारतीय जनता पक्षाने सुरुवात केली आहे. भाजपात येण्यासाठी अनेक उत्सुक आहेत, असे सूतोवाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. कोण-कोण यायला उत्सुक आहेत, हे वेळ आल्यावर सांगतो असे सांगितले होते. नांदेड शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक मुन्नासिंह तेहरा यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

भाजप चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे नांदेडच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीत भाजपला महाविजय मिळवून देण्यासाठी कामाला लागा, असा आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

Nanded Politics
Ashok Chavan News : 'ईडब्ल्यूएस' निर्णय योग्य पण क्रेडिट महाविकास आघाडीला, अशोक चव्हाण म्हणतात...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या (Ashok Chavan) बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यास भाजपने सुरुवात केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक मुन्नासिंह तेहरा यांना भाजपात आणले आहे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी तेहरा यांच्या गळ्यात भाजपाचा दुप्पटा टाकला.ा

यावेळी मुन्नाभाई यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशासाठी केलेले कार्य आणि गोरगरिबांसाठी आणलेल्या योजना पाहून भाजपमध्ये प्रवेश घेतल्याचे सांगितले. तसेच पक्ष बळकट करण्यासाठी पूर्ण वेळ पक्षांसाठी काम करेन, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुन्नासिंह तेहरा यांनी नगरपालिका व महापालिकेमध्ये नगरसेवक, उपाध्यक्ष व सभापतीपद भूषविले आहे. राजपूत समाजातही त्यांनी अनेक पदे भूषविले आहेत. ते जनाधार असलेले पदाधिकारी असून भारतीय जनता पक्षासाठी नांदेड फायदा होणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Nanded Politics
Gondia News : जुन्या वादातून ग्रामपंचायत कार्यालयातच तुफान हाणामारी; पोलिसांत गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com