Marathwada Political News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नांदेड लोकसभेची जागा भाजप जिंकू शकत नाही, याची जाणीव झाली आहे. (Nanded Congress News) म्हणूनच ते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा घडवून आणत आहेत, असा टोला काँग्रेसचे माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष अमर राजूरकर यांनी लगावला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यास इच्छूक असल्याचा दावा केला. यावर (BJP) भाजपचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर (Nanded) यांनीही महाविकास आघाडीच्या काळातही होऊ शकली नाही, अशी मदत तोट्यात असलेल्या भाऊराव चव्हाण कारखान्याला महायुतीच्या सरकारने केली, असा दावा केला.
दीडशे कोटींची मदत या सरकारने चव्हाण (Ashok Chavan) यांच्या कारखान्याला केल्यामुळे ते भाजपमध्ये येऊ शकतात, असे मलाही वाटते म्हणत चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला हवा दिली होती. (Marathwada) परंतु या दाव्यावर अशोक चव्हाण यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी त्यांची सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमर राजूरकर यांनी मात्र भाजपचा दावा म्हणजे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नांदेडची जागा भाजप जिंकू शकत नाही, या नैराश्येतून बावनकुळे संभ्रम निर्माण करत आहेत. दिशाभूल, संभ्रम निर्माण करणे ही भाजपची पद्धत आहे. आताच्या खासदारांनी काँग्रेस, अपक्ष, लोकभारती, शिवसेना असे पक्ष बदलले, त्यांना इतरही दलबदलू असतील असे वाटत असावे. मग हे खासदार बीआरएसकडून लढणार असे,आम्ही म्हणावे का? असा टोलाही अमर राजूरकर यांनी चिखलीकर यांचे नाव न घेता लगावला.
वर्षभरापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा सुरू आहेत. स्वतः चव्हाण यांनी याचे अनेकदा खंडण केले. परंतु वारंवार पुन्हा त्याच चर्चा होत असल्याने त्याला उत्तर न देण्याची भूमिका चव्हाण यांनी घेतल्याचे बोलले जाते. त्यांच्या वतीने अमर राजूरकर यांनी मात्र भाजपच्या या चर्चा म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून आगामी लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून विजय मिळणार नाही या नैराश्यातून अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे म्हटले आहे.
बावनकुळे यांच्या दौऱ्यात काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटास राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश भाजपमध्ये झाला होता. भाजपच्या एका बैठकीत बावनकुळे यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यास उत्सूक असल्याचे जाहीर भाषणात सांगितले होते.
त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली, चिखलीकर यांनीही यावरून चव्हाण यांनी भाजपच्या नेत्यांसमोर हात पसरले म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला होता. अमर राजूरकर यांनी चिखलीकरांना सडेतोड उत्तर देत चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा म्हणेज निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.