Marathwada News : अनेक वर्ष तोट्यात असलेली आणि आता फायद्यात आलेली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकरभरती प्रक्रिया वादात सापडली आहे. सरळ सेवा भरती प्रक्रियेचा अनुभव आणि परीक्षा घेण्यासाठी सर्वात कमी दराची निविदा भरलेल्या 'एमकेसीएल' ऐवजी पुण्याचा एका कंपनीला पंसती दिल्याने संचालक मंडळाच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे. संचालक मंडळातील अनेकांनी नोकरभरतीमध्ये आपल्या नात्या-गोत्यातील लोकांची वर्णी लावण्यासाठीच ही खेळी केल्याचा आरोप केला जातोय.
नोकरभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी शासनमान्य तीन संस्थांकडून आलेल्या निविद्यांमध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) ही सर्वात कमी दर देणारी संस्था असताना त्यांनी निविदा नाकारण्यात आली. (Nanded) त्याऐवजी बँकेने पुण्याच्या 'वर्कवेल इन्फोटेक'ला पसंती दिल्याची माहिती संचालक मंडळाच्या सभेनंतर समोर आली. जिल्हा बँकेत अधिकारी व लिपिक श्रेणीतील मिळून 156 पदांची भरती होणार असून, त्यासाठी त्रयस्थ संस्थेद्वारे ऑनलाईन परीक्षा घेणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने एमकेसीएलने प्रति उमेदवार 470 रुपये, अमरावतीच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूटने 330 रुपये आणि वर्कवेलने 507 रुपये असा दर दिला होता. (Marathwada) नंतरच्या वाटाघाटीत वर्कवेलने दरात कपात केली असली तरी एमकेसीएलचे दर कमी होते. मात्र, संचालक मंडळाने अखेरीस वर्कवेललाच संमती दिली. या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. एमकेसीएल ही शासन सहकार्यातून स्थापन झालेली, राज्यभरात विश्वासार्ह मानली जाणारी संस्था आहे.
शिवाय सर्वात कमी दराची त्यांची निविदा नाकारण्यात आल्याने यामागे मोठे राजकारण शिजत असल्याचा आरोप केला जात आहे. नांदेड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी असल्याने आपल्यासोयीनूसार ही नोकरभरती प्रक्रिया करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. एकूणच नांदेड जिल्हा बँकेची नोकरभरती संशयाच्या फेऱ्यात आली आहे.
दरम्यान, आयबीपीएस आणि टाटा कन्सल्टन्सी या मोठ्या कंपन्यांना निमंत्रण देण्यात आले होते; परंतु त्यांनी सहभाग नोंदविला नाही. परिणामी उरलेल्या संस्थांपैकी वर्कवेलला पसंती मिळाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हा बँकेचे सीईओ कदम यांच्याशी संपर्क साधला असता अन्य संस्थांचा या क्षेत्रातील कमी अनुभव आणि मागील कामांचा तक्रारींचा आढावा घेऊनच योग्य संस्थेची निवड करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.