Ravikant Tupkar Sarkarnama
मराठवाडा

Nanded finance company offices : क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; नांदेडमधील दोन फायनान्स कंपनीचे कार्यालय कार्यकर्त्यानी फोडले

Nanded finance company offices News : नांदेडमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन खासगी फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड केली आहे.

Sachin Waghmare

Nanded News : राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना फायनान्स कंपन्यांकडून सक्तीने कर्जाची वसुली केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. नांदेड येथील चंद्रकांत शिंदे आणि लातूर येथील दत्तात्रय कुंभार या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूमागे मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीचा दबाव असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच आता या फायनान्स कंपनीच्या विरोधात रविकांत तुपकर यांची क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. नांदेड शहरातील दोन फायनान्स कंपनीचे कार्यालय कार्यकर्त्यानी फोडले आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांनी केली आहे.

'दुष्काळात शेतकऱ्यांच्या दारात जाऊन जबरदस्ती वसुली कराल, महिलांना त्रास द्याल, तर एकही फायनान्स कंपनीचे कार्यालय शिल्लक ठेवणार नाही,' असा आक्रमक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. आता या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधवसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन खासगी फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड केली आहे.

नांदेडमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड केली आहे. त्यामुळे येत्या काळात क्रांतिकारी शेतकरी संघटना व मायक्रो फायनान्स कंपन्या समोरासमोर येणार आणि राज्यात आंदोलन पेटणार असल्याचा इशारा नेत्यांनी दिला आहे.

नांदेड येथील चंद्रकांत शिंदे आणि लातूर येथील दत्तात्रय कुंभार या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूमागे मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीचा दबाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. या दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची रविकांत तुपकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले होते. या घटनांच्या पार्श्वभूमीवर तुपकरांनी मायक्रोफायनान्स कंपन्या, खासगी फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांच्या वसुली पद्धतींविरोधात आक्रमक भूमिका जाहीर केली होती.

नांदेड शहरातील दोन फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांना लक्ष्य करण्यात आले असून सोमवारी या कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्यात दुष्काळाने शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांचे जगणे कठीण झाले असताना मायक्रोफायनान्स आणि खासगी फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप रविकांत तुपकर यांनी यापूर्वी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT