Nanded Hospital News Sarkarnama
मराठवाडा

Nanded Hospital News : नांदेडमधील मृत्यू रोखण्यासाठी काँग्रेस सरसावली; नवीन भरती होईपर्यंत ५० परिचारिका देणार सेवा...

Congress News : आतापर्यंत काँग्रेसकडून सात लाखांच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला.

Mangesh Mahale

Nanded : नांदेडच्या सरकारी वैद्यकीय रुग्णालयात एकाच दिवसात 24 मृत्यू झाल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणेची बेपर्वाई चव्हाट्यावर आली. अद्यापही मृत्यूचे सत्र थांबलेले दिसत नाही. अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असलेल्या नांदेडच्या सरकारी रुग्णालयासाठी काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयाला काँग्रेस पक्षाकडून ५० परिचारिका सेवेसाठी देण्यात आल्या आहेत.

सरकारकडून नवीन भरती होईपर्यंत या परिचारिकांची सेवा सुरू राहणार आहे. परिचारिकांचे वेतन आणि सर्व खर्च काँग्रेसकडून केला जाणर आहे, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. डॉक्टर देण्याची परवानगीदेखील काँग्रेसने सरकारकडे मागितली होती, पण सरकारने त्याला परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले .

"आतापर्यंत काँग्रेसकडून सात लाखांच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला. पन्नास परिचारिकांच्या सेवेमुळे वैद्यकीय महाविद्यालयाला मोठी मदत होणार आहे. सरकारची परवानगी घेऊनच ही सेवा देण्यात येत आहे," असे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्यामराव वाकोडे यांनी सांगितले.

नांदेडमध्ये सहा दिवसांत सुमारे ६२ रुग्णांचे प्राण गेले आहेत. यात नवजात बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. नांदेड येथील बालकांच्या मृत्यूची दखल राज्य बालहक्क आयोगाने घेतली आहे. ६२ रुग्णांच्या मृत्यूला कोण जबाबदार, असा संतप्त सवाल मृत व्यक्तींच्या नातेवाइकांनी प्रशासनाला केला आहे.

राज्य आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी नांदेड पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून या प्रकरणी चौकशी करावी. या प्रकरणाला जबाबदार कोण याबाबतचा अहवाल पाठवावा, असे आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे नांदेड रुग्णालय प्रकरणात आता प्रशासनाच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे चिन्ह आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT