Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav ThackeraySarkarnama

Thackeray Vs Shinde : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिंदे-ठाकरे गट भिडले; 'होऊ दे चर्चा' कार्यक्रमात राडा

Maharashtra Politics : पोलिसांच्या सूचनेनंतर ठाकरे गट तेथून निघून गेल्याने वाद वाढला नाही.
Published on

Thane :ठाणे शहरात ठाकरे गटाकडून ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून चौक सभांचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी शिंदे गटाने हा कार्यक्रम रोखल्याने दोन्ही गटांत राडा झाला. केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आलेली आश्वासने खोटी होती, त्याची पोल खोल करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

या कार्यक्रमासाठी शनिवारी ठाण्यातील हाजुरी भागात ठाकरे गटाचे कार्यकर्ते येताच स्थानिक नागरिक आणि शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. दोन्ही गटांत वाद झाल्याने दोन्ही गट आमने-सामने आले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हा वाद मिटला. पोलिसांच्या सूचनेनंतर ठाकरे गट तेथून निघून गेल्याने वाद वाढला नाही.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Maharashtra Politics : सत्ताधारी-विरोधकांमध्ये 'मदारी'वरून नवा 'खेळ' सुरू; फडणवीस-राऊतांमध्ये 'डमरू' वाजण्यास सुरुवात

स्थानिक रहिवासी यांनीच या कार्यक्रमाला आक्षेप घेतल्याने कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही ठाकरे गटाला हा कार्यक्रम हाजुरीत करू नका, अशा सूचना दिल्याचे वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सांगितले. वाद तत्काळ मिटला असून, परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे कारण देत, ठाकरे गटाच्या माध्यमातून आयोजित 'होऊ द्या चर्चा' कार्यक्रम थांबविण्याचे आदेश दिले होते. यावरून महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत टीकास्त्र सोडले होते.

ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला स्थानिकांनी विरोध केला. हाजुरीत राजकीय वातावरण बिघडवू नका, असे म्हणत या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला. मात्र, ठाकरे गटाचे कार्यकर्ते ऐकण्यास तयार नव्हते, तेव्हा काही काळ दोन्ही गटांत शाब्दिक बाचाबाची होऊन वाद झाला. दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू झाली, वाद वाढत असल्याचे लक्षात येताच, वेळीच पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Sanjay Raut News : फडणवीस डमरू वाजवतात अन् दोन माकडे नाचतात; राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली पिसे ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com