Shambhuraj Desai News : एकही आमदार नसणाऱ्या आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांवरील विधान निंदनीय; शंभूराज देसाईंचा टोमणा

Maharashtra Politics : मोदींना फायदा होईल की महायुतीला होईल याचा त्यांनी विचार करू नये," असा टोला त्यांनी लगावला.
Shambhuraj Desai, Prakash Ambedkar
Shambhuraj Desai, Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Satara : "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हेही कंत्राटी पद्धतीने भरायला सुरुवात करा," असा टोला लगावून ही कंत्राटी पद्धत बेकायदेशीर असून, हे सरकारही पूर्णपणे बेकायदा आहे," अशी जहरी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यातील सरकारवर केली.

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंना आंबेडकरांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या विधानभवनात 288 आमदारांपैकी एकही आमदार नसणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी बहुमत असलेल्या महायुतीच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत केलेले वक्तव्य हे निंदनीय असल्याची टीका केली आहे.

Shambhuraj Desai, Prakash Ambedkar
Thackeray Vs Shinde : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिंदे-ठाकरे गट भिडले; 'होऊ दे चर्चा' कार्यक्रमात राडा

"इंडिया आघाडी न झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना फायदा होईल," असे विधानही प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. त्यावर शंभूराज देसाईंनी निशाणा साधला आहे. "इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या. त्यात प्रकाश आंबेडकरांना बोलावलं नव्हतं. त्यामुळे स्वतःला स्थान मिळते का याचा विचार त्यांनी करावा. मोदींना फायदा होईल की महायुतीला होईल याचा त्यांनी विचार करू नये," असा टोला त्यांनी लगावला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज्य सरकारच्या भरती प्रक्रियेवर टीका केली. ते म्हणाले, "महाराष्ट्रात खासगीकरणाची सुरुवात झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापेक्षा अधिक क्षमता व नैतिकता असणारी अनेक माणसे आहेत,"

"नोकर भरती करण्याचा अधिकार हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही नाही. हा अधिकार लोकसेवा आयोगाला आहे. सरकारला कोणता आयोग ते ठरविण्याचा अधिकार आहे. निवडण्याचा नाही. हा अधिकारी राष्ट्रपती आणि राज्यपालांनाच आहे, असे आंबेडकर म्हणाले.

Shambhuraj Desai, Prakash Ambedkar
Maharashtra Politics : सत्ताधारी-विरोधकांमध्ये 'मदारी'वरून नवा 'खेळ' सुरू; फडणवीस-राऊतांमध्ये 'डमरू' वाजण्यास सुरुवात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com