Nanded Loksabha Constituency Sarkarnama
मराठवाडा

Nanded Lok Sabha News : 38 हजार नवमतदार चमत्कार घडवणार...

New Voters in Nanded Lok Sabha Constituency : नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदारनोंदणीला वेग, नवमतदार निकालाला कलाटणी देऊ शकतात.

Jagdish Pansare

Nanded Election News :

आगामी लोकसभा निवडणुकीची राजकीय पक्षांनी आणि प्रशासनानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदानाचा टक्का वाढवा, नव्या मतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांचा नोंदणीसाठीचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.

नांदेड (Nanded) जिल्ह्यात तब्बल 38 हजार नवमतदारांची नोंदणी झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. हे नवमतदार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) निकाल फिरवण्याची शक्यता आहे. आता हा तरुण नवमतदार कोणाच्या पारड्यात त्याच्या मतांचे दान टाकतो, यावर जय-पराजयाचे गणित अवंलबून असणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारयादी (Voters list) तयार करण्यात येत आहे.

अर्ज क्रमांक सहा म्हणजेच नवीन 38 हजार 390 मतदारांची नोंद झाली आहे, तर 46 हजार 676 मतदारांची नावे वगळण्यात आली (अर्ज क्रमांक सात) आहेत. कुणीही मतदानापासून वंचित राहू नये, म्हणून निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम पाठवला असल्यामुळे मुदतवाढ देण्यात आली असून आता अंतिम मतदारयादी 22 जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील मतदार

जिल्ह्यातील मतदारांची संख्या 26 लाख 71 हजार 194 झाली असून त्यात 13 लाख 81 हजार 29 पुरुष मतदार आहेत, तर 12 लाख 9 हजार 11 स्त्री मतदार आणि 154 इतर मतदारांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सध्या निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारयादी अंतिम करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ असून मतदारसंघनिहाय मतदारयादीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यात नवीन मतदारांची नोंद करणे, स्थलांतर किंवा मृत झाले असतील तर नाव वगळणे, तसेच पत्ता, फोटो आदी कामे करण्यात येत आहेत.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभाग मतदारयादीची कामे वेगाने करीत आहेत. 22 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली असल्याने मतदारांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT