Nanded News : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या पंधरा दिवसात होईल असे सांगणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार मात्र अद्यापही ठरत नाहीये. महायुतीकडून नांदेडची जागा जिंकण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी बैठका, मेळाव्यांवर जोर दिला आहे. विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे वैयक्तिक पातळीवरही कामाला लागले आहेत. (Latest Marathi News)
गेल्या आठवडाभरापासून अशोक चव्हाण हेही नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. मात्र काँग्रेस महाविकास आघाडीकडून नांदेडमध्ये कोण लढणार? हे मात्र अजूनही ठरत नाहीये. अशोक चव्हाण यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात असले तरी ते स्वतः मात्र लोकसभा लढवण्यास फारसे इच्छूक नसल्याची चर्चा आहे. चव्हाणांनी माघार घेतली तर त्यांना पर्याय ठरू शकेल असा काँग्रेसचा दुसरा नेता कोण? याचाही शोध सुरू आहे.
माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ. मिनल पाटील खतगावकर यांचे नाव प्राथमिक यादीत उमेदवार म्हणून सुचवण्यात आल्याचीही चर्चा आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेचा गड म्हणून ओळखला जातो. पण गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला होता.
काँग्रेसच्या दृष्टीने हमखास निवडून येणाऱ्या राज्यातील मोजक्या जागांमध्ये नांदेडचा समावेश केला जातो. अशोक चव्हाण उमेदवार असले तरी ही शक्यता अधिक बळावते. मात्र चव्हाण यांचा यंदा लोकसभा लढवण्याचा मुड नसल्याची चर्चा आहे. तरी पक्षाने त्यांना निवडणूक लढविण्याचा आदेश दिला तर ते मैदानात उतरतील. पण सध्या तरी गेल्या काही महिन्यांपासून डॉ. मिनल पाटील खतगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्याही नावाची चर्चा अधूनमधून होतांना दिसते. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावोगावी जाऊन मतदारांचा कल काय आहे? उमेदवार कोण असावा ? याबाबत चाचपणी करत आहेत. भाजपकडून खासदार चिखलीकर यांनी निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. भाजपाला ही जागा पुन्हा जिंकायची आहे तर दुसरीकडे काँग्रेस पराभवाचा वचपा काढण्यासाठी आतूर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.