Nanded Congress Sarkarnama
मराठवाडा

Nanded Politics : नांदेडमध्ये काँग्रेसचे 'ते' चार प्रबळ उमेदवार कोण? चर्चांना उधाण

Nanded Lok Sabha Constituency Congress Politics : नांदेडमध्ये काँग्रेसकडे एक नव्हे तर चार प्रबळ उमेदवार? कोण आहे ते? चर्चा रंगल्या...

Laxmikant Mule

Nanded Lok Sabha Constituency Politics News :

लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना काँग्रेसला नांदेडच्या जागेसाठी उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन जय श्रीराम म्हणत भाजपमध्ये प्रवेश केला. या अचानक उद्भवलेल्या अडचणींवर मात करून नांदेडच्या जागेसाठी सक्षम उमेदवार देण्याची गरज निर्माण झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन निरीक्षकांना पक्षाने नांदेडला पाठविले होते. पक्षाकडे नांदेडच्या जागेसाठी चार उमेदवार आहेत. नांदेडची जागा Congress खूप मोठ्या मताधिक्याने जिंकणारच, असे या पक्षनिरीक्षकांनी पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितले. पण ते चार उमेदवार कोण आहेत? हे सांगण्याचे पद्धतशीरपणे टाळले. त्यामुळे ते असतील? या बाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली असतानाच आघाडी व महायुती उमेदवारांचा शोध घेत आहे. काही मतदारसंघात उमेदवारांची नावे निश्चित झाली आहे. ज्यांना उमेदवारी मिळण्याची शाश्वती आहे, अशा उमेदवारांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती नाजूक झाली आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याने पक्षामध्ये गोंधळ उडाला आहे.

जिल्ह्याची परिस्थिती हाताळण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, अनिल पटेल नांदेडला आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नांदेडच्या जागेसाठी सक्षम उमेदवार देणार आहोत, असे सांगितले. आमच्याकडे एक नव्हे तर चार उमेदवार आहेत, असा दावाही केला. नांदेडची जागा काँग्रेसला सोडण्यात येणार असली तरी उमेदवार कोण असेल? याची चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक चव्हाण नांदेडमध्ये कधी येणार?

काँग्रेसच्या गोटात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, काँग्रेसमधून भजपमध्ये गेलेले माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, या नावांची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडू नांदेडच्या जागेची मागणी करण्यात येत असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. आता काँग्रेसचे चार इच्छुक उमेदवार कोण? ते भाजपला टक्कर देऊ शकतील का? असे सवाल या निमित्ताने उपस्थीत केले जात आहेत.

दरम्यान, भाजपमध्ये जाऊन राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यापासून अशोक चव्हाण नांदेडमध्ये आलेले नाहीत. आता ते नांदेडमध्ये कधी येणार? आणि भाजपकडून लोकसभेसाठी कोणाच्या नावाला पसंती देतात? यावर काँग्रेसच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT