Nanded Congress Politics : कालपर्यंत ज्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा शब्द नांदेड जिल्ह्यात अंतिम मानला जात होता, तेच अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले. याचा जिल्ह्यातील निष्ठावंतांना चांगलाच राग आला आहे. अशोक चव्हाण गेले, आत्या त्यांनी जाहीर केलेली जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणीही नको, असा आक्रमक पावित्रा घेत ती बरखास्त करण्याची मागणी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. Ashok Chavan News
अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस सावरण्यासाठी युद्ध पातळीवर कामाला लागली आहे. पक्षाने नांदेडला दोन निरीक्षक पाठविले होते. या निरीक्षकांपुढेच अशोक चव्हाण यांच्या शिफारशीनुसार नियुक्त करण्यात आलेली काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी तातडीने बरखास्त करा, अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. नांदेड शहराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, नवीन शहराध्यक्ष लवकरच निवडण्यात येणार आहे. Nanded Congress News
नांदेड जिल्ह्याची सर्व सूत्रं गेली चार दशके अशोक चव्हाण यांच्याकडे होती. नांदेड जिल्हा काँग्रेसचा सातबाराच अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नावे होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशी परिस्थिती होती. पण अशोक चव्हाण हा सातबारा घेऊन भाजपत (BJP) गेल्याने काँग्रेसला नव्याने जिल्ह्यात पक्षबांधणी करावी लागणार आहे. नांदेडच्या काँग्रेसला सावरण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe), अनिल पटेल (Anil Patel) हे नांदेडला आले होते.
त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसेच अडचणी समजून घेतल्या. जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच दोन्ही डगरीवर हात ठेवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, अशी मागणी केली. नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, तो राहणारच. Ashok Chavan News
लोकसभेसाठी सक्षम उमेदवार द्या, आम्ही नक्कीच विजय मिळवून देऊ, असा विश्वास कार्यकर्त्यांनी पक्षनिरीक्षकांना दिला. काँग्रेस (Congress) समोर जिल्ह्यात पक्षाची बांधणी करून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी सर्वसमावेशक व सक्षम पदाधिकाऱ्यांना जिल्ह्याची धुरा द्यावी लागणार आहे. Nanded Congress Politics
Edited By : Rashmi mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.