Bhaskar Patil Khatgaonkar-Pratap Patil Chikhlikar News Sarkarnama
मराठवाडा

Pratap Patil Chikhlikar News : राष्ट्रवादीत नाराजी नाट्य, चिखलीकरांनी विश्वासात घेतले नाही म्हणत खतगावकर निघून गेले!

Bhaskarrao Khatgaonkar accuses Chikhalkar of appointing office bearers without consultation : सगळ्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे अस माझं मत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती झाली असल्याचे सांगत चिखलीकर यांनी खतगावकर यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केले.

Jagdish Pansare

Nanded Political News : माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांची नाराजी राज्याच्या वरिष्ठ नेत्यांवर नसून ती स्थानिक नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर आहे. जिल्ह्यातील संघटनात्मक नियुक्ती झालेल्या एका पदाधिकाऱ्याच्या नावावर आक्षेप घेत खतगावकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. तसेच पत्रकार परिषद अर्धवट सोडून ते निघून गेले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची नव्याने संघटनात्मक बांधणी सुरू आहे. प्रताप पाटील चिखलीकर (Prataprao Patil Chikhlikar) राष्ट्रवादीकडून आमदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाला जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसह, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व इतर पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देत चिखलीकर यांनी अजित पवारांना विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांच्यासह चार माजी आमदारांनी पक्षात प्रवेश केला असला तरी सगळे निर्णय जिल्हा पातळीवर चिखलीकर हेच घेत आहेत.

अजित पवारांनीही त्यांना तसा फ्री हँन्ड दिला आहे. त्यानूसार जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नांदेड शहर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदांसाठी काही बदलही करण्यात आले आहेत. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नुकतीच कार्यकारिणीची घोषणा करत नियुक्तिपत्रांचे वाटप केले. नांदेड दक्षिणच्या निवडीवरून भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil) यांनी नाराजी व्यक्त केली. तुमच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत, पण आम्हाला सासूबाई म्हणून विचारत जा, असा टोला त्यांनी लगावला.

एवढेच नाही तर याबाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगत ते भर पत्रकार परिषदेतून निघून गेले. प्रकृती बरी नसल्याचे कारण त्यांनी उपस्थितांना दिले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी उघडपणे दिसत होती. शहर जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश उपाध्यक्षपदी मीनल खतगावकर, शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी माधव पावडे तर, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी शिवराज पाटील होटाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पैकी खतगावकर यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली. आपल्याला विश्वासात न घेता ही निवड जाहीर करण्यात आल्याचे खतगावकर यांनी सांगितले. चिखलीकर आज सकाळपासून माझ्यासोबत होते, आम्ही सोबत नाष्टा केला. तरी, नांदेड दक्षिणच्या नियुक्तीबाबत आमचे ठरले नव्हते, असे असतानाही चिखलीकरांनी आम्हाला न सांगता नांदेड दक्षिणची नियुक्ती जाहीर केली आहे.

पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही निश्चित प्रयत्न करा पण, सासूबाई म्हणून आम्हाला एकदा तरी विचारा, अशा शब्दात खतगावकर यांनी नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे आमदार चिखलीकर यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊनच पक्षाने हा निर्णय घेतला आहे. एखाद्याची नाराजी असू शकते, जिल्ह्याच नेतृत्व करत असताना सगळ्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे अस माझं मत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती झाली असल्याचे सांगत चिखलीकर यांनी खतगावकर यांच्या नाराजीकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT