Nanded Sarpanch Election Crime : ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज पात्र ठरण्याच्या निकषात अडसर ठरणाऱ्या तिसऱ्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावातील पांडुरंग कोंडमंगले (वय २८) याने तेलंगणात नेऊन ही हत्या केल्याची माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केरूर गावचा रहिवासी असलेला पांडुरंग कोंडमंगले (वय २८) हा गावात सलून चालवतो. पांडुरंगला तीन अपत्य आहेत. त्यामध्ये एक तीन वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या जुळ्या मुली आहेत. पांडुरंगला आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले होते आणि या निवडणुकीत उभे राहून त्याला गावचं सरपंच व्हायचं होतं.
परंतु महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अधिनियमानुसार दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही हे समजताच त्याने आपल्या एका मुलीची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याला हा सल्ला सरपंच गणेश शिंदे याने दिल्याचं तपासात समोर आलं आहे.
याच निर्णयानुसार पांडुरंगने आपली मुलगी प्राची कोंडामंगले हिला गुरुवारी (ता.२९) सकाळी शाळेत जाताना सोबत घेतले आणि बोधन (जि.निजामाबाद) येथे साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे सांगत दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर प्राचीला बोधन जवळील कट्टापल्ली शिवारातील वाहणाऱ्या कॅनालमध्ये फेकून दिलं.
मात्र, त्याने मुलीला फेकताना एका शेतकऱ्याने पाहिलं होतं. त्यानंतर शुक्रवारी तेलंगणातील पोलीस दुचाकीच्या नंबरवरून नावाचा शोध घेत मुखेड येथे आले. त्यांनी स्थानिक पोलिसांना ही घटना सांगितली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपी पांडुरंगला चौकशीला बोलावलं असता त्याने चौकशीत आपला गुन्हा कबूल केला.
दरम्यान, निजामाबाद पोलिसांनी पांडुरंग कोंडमंगले याला अटक केली असून, त्याला मदत करणारा सरपंच गणेश शिंदे यालाही सह आरोपी करण्यात आले आहे. दोघांवरही हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.