Satyajit Bade : IAS सत्यजित बडे यांची पुण्यात दिव्यांग आयुक्तपदी नियुक्ती

Satyajit Bade IAS Appointment : सत्यजित बडे यांचा प्रशासकीय कामकाजातील दीर्घ अनुभव आणि विकासाभिमुख कार्यपद्धती लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी बडे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही प्रभावीपणे काम पाहिले आहे.
IAS officer Satyajit Bade, newly appointed Divyang Commissioner in Pune, known for his people-centric administration and rural development initiatives.
IAS officer Satyajit Bade, newly appointed Divyang Commissioner in Pune, known for his people-centric administration and rural development initiatives.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 03 Feb : रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे (आयएएस) यांची पुणे येथील दिव्यांग व्यक्तींसाठी आयुक्त या महत्त्वाच्या पदावर सोमवारी (ता २) नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशासकीय कामकाजातील त्यांचा दीर्घ अनुभव आणि विकासाभिमुख कार्यपद्धती लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी बडे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही प्रभावीपणे काम पाहिले आहे.

प्रशासकीय नियोजन, लोकाभिमुख निर्णय आणि तळागाळातील घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यात त्यांचा हातखंडा राहिला आहे. सन 2006 मध्ये आंबेगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी विशेष ठसा उमटविला होता..

IAS officer Satyajit Bade, newly appointed Divyang Commissioner in Pune, known for his people-centric administration and rural development initiatives.
Vasai Virar Politics: वसई विरार महापालिकेत 'शिट्टी'च्या धाकानं 'कमळ' अज्ञातवासात; भाजपचे 43 नगरसेवक अज्ञातस्थळी

या कालावधीत त्यांनी जिल्हा परिषद शाळांचे व्यापक नूतनीकरण, महिला बचत गटांची स्थापना व संघटन, ग्रामीण महिलांसाठी उद्योग व व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, यांसारखी कामे प्राधान्याने राबविली होती. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, तर ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतही सकारात्मक बदल दिसून आले.

IAS officer Satyajit Bade, newly appointed Divyang Commissioner in Pune, known for his people-centric administration and rural development initiatives.
Akola Mahapalika: भाजपनं अखेर अकोल्यात गेम फिरवलाच; काँग्रेस-वंचितचं गणित फसलं, उद्धव ठाकरेंना मोठा झटका

पुणे येथे दिव्यांग आयुक्त म्हणून काम करताना दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण, पुनर्वसन योजना, कौशल्य विकास आणि समावेशक प्रशासन आदिकामे प्रभावीपणे केली जाणार असल्याचे बडे यांनी सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com