Dharashiv News : राज्यभरात सोमवारी उत्साही वातावरणात नवरात्र उत्साहाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या उत्साहात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना मोठे सरप्राईज मिळाले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. तुळजापूर येथील दोन प्रमुख बसस्थानकांना आता ऐतिहासिक नावे देण्यात आले आहेत. बसस्थानकाला दिलेल्या 'या' नावामुळे तुळजापूरच्या इतिहासाला उजाळा मिळणार आहे.
तुळजापूर शहरातील मुख्य बसस्थानकाला 'श्री तुळजाभवानी बसस्थानक' आणि दुसऱ्याला 'छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक' असे नाव देण्यात आले आहे. या नामकरण सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. स्थानिक जनतेच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले, 'यावर्षी कोजागिरी पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी राज्यभरातून तब्बल 1100 बससेवा सुरू करण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भक्तांसाठी ही सोय म्हणजे सुरक्षित व किफायतशीर प्रवासाची मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे. एसटी महामंडळाकडून भाविकांच्या सेवेसाठी उचललेले हे पाऊल हे फक्त सोयीपुरते नाही, तर ती आई तुळजाभवानीच्या भक्तांसाठीची नवी वाहतूक यज्ञसेवा ठरणार आहे.'
आई तुळजाभवानीचा आशीर्वाद एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांवर व भाविक प्रवाशांवर सदैव राहण्यासाठी आई तुळजाभवानीच्या सेवेसाठी अहोरात्र राबणाऱ्या एसटीचे चालक, वाहक व कर्मचारी यांच्या श्रमाला उत्साहाची नवी उर्जा मिळावी म्हणून यंदा 50 नव्या बसची भर घालण्यात आली आहे. या बस खास भक्तांच्या प्रवासासाठी तुळजापूर मार्गावर धावणार असून, भाविकांना सुखरूप आणि सोयीस्कर प्रवासाची हमी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तुळजापूर शहरात नवरात्रीच्या उत्साहाच्या निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी परिवहन महामंडळाचे कर्मचारी परिश्रम घेत असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.