Eknath Shinde warning : अजितदादानंतर शिंदेंनाही खडबडून जाग : मंत्र्यांना दिला काम करण्याचा डोस नाहीतर घरी घालवण्याचा इशारा!

Eknath Shinde displeased News : मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांनी येत्या काळात कामगिरीत सुधारणा केली नाही तर विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लवकरच होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दुसरीकडे मात्र महायुती एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे ठरले आहे. त्यामुळे वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी मंत्र्यांची कानउघाडणी केली आहे. त्यांनी जिल्ह्यात न येणाऱ्या पालकमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांनी येत्या काळात कामगिरीत सुधारणा केली नाही तर विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्यांच्या कामगिरीबाबत तक्रारी येत असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदे यांनी शिवसेना नेत्याच्या आढावा बैठकीप्रसंगी पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांची कानउघडणी केल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची कॅबिनेटच्या बैठकीनंतर एक गुप्त बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्र्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.

Eknath Shinde
BJP Ram Shinde bridge Karjat Jamkhed : राम शिंदेंनी बांधलेला पूल वाहून गेला, कशी बोगस कामे होतात बघा! लोकांसाठी लढतोय, स्टाईल बदलणार नसल्याचा रोहित पवारांचा इशारा

एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारे दुर्लक्ष यावरून भरबैठकीतच संताप व्यक्त केला. अकार्यक्षम आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, तसेच मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारे दुर्लक्ष या मुद्द्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Eknath Shinde
MNS Shiv Sena alliance: ज्या मनसेचे 6 नगरसेवक फोडले त्यांनाच उद्धव ठाकरे भरभरून देणार... राज ठाकरेंसोबतच्या युतीचा फॉर्म्युला ठरला ?

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळे पक्षवाढीकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले होते. मात्र पक्षवाढीकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे मंत्री कामच करणार नसतील तर त्यांच्याबाबत येत्या काळात विचार करावा लागेल, असा दमच शिंदे यांनी बैठकीप्रसंगी भरला आहे.

Eknath Shinde
Mahayuti Goverment : करदात्यांच्या कोट्यावधी रुपयांचा सहज चुराडा : निम्मी महामंडळे गतप्राण, कर्मचारी फक्त खुर्ची गरम करतायत

त्यासोबतच गेल्या अनेक दिवसापासून शिवसेनेच्या मंत्र्यांना जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना देऊनही त्याच्याकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे. पक्षवाढीबाबत अनेक मंत्री कार्यरत नसल्याची तक्रार आहे. सोमवार ते बुधवार कॅबिनेटनंतर मतदार संघात उपस्थित राहण्याबाबत मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच जनतेचे प्रश्न सोडवा अन्यथा विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा शिंदे यांनी दिला आहे.

Eknath Shinde
Nashik BJP News : नाशिकमध्ये भाजपचे दोन माजी नगरसेवक गजाआड, संकटमोचक महाजन त्यांना वाचविणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com