Ajit Pawar, NCP Sarkarnama
मराठवाडा

Beed : "लाखच खर्च केले, चुकून कोटी म्हणालो" : व्हिडीओ व्हायरल होताच काही तासात अजितदादांच्या आमदाराची पलटी

Beed : माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर 40 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त निवडणूक खर्च केल्याचा आरोप आहे. यासंबंधीत भाषणातील त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.

Hrishikesh Nalagune

Beed : धनंजय मुंडे, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी आमदार अडचणीत आले आहेत. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर 40 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त निवडणूक खर्च केल्याचा आरोप आहे. यासंबंधीत भाषणातील त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. तर आपल्याला लाख रुपये म्हणायचे होते पण आपण चुकून कोटी म्हणालो असे म्हणत सोळंके यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

शनिवारी (8 मार्च) बीडमधील वडवणी येथील 30 खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाच्या भूमिपुजन समारंभात प्रकाश सोळंके बोलत होते. यावेळी ते म्हणाले, निवडणूक आली की कोणीबी येतं आणि निवडणुकीत उभं राहतं. कुणीबी येतो आणि पैशाच्या जोरावर निवडणुकीत उभं राहतं अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळाली.

पण मी ऐकलं की गत निवडणुकीत माजलगावमधील एका उमेदवाराला 45 कोटी तर दुसऱ्याला 35 कोटी लागल्याचे चर्चा आहे. लोक सांगतात मला काही माहित नाही मला मात्र दहा-बारा कोटी लागले आणि मी निवडून आलो. थोडक्यात निवडून येण्यासाठी पैसे लागतात असे काही नाही सर्वसामान्यांची कामे करावे लागतात, असाही दावा सोळंके यांनी केला. 

पण हा व्हिडीओ व्हायरल होताच काही तासात आमदार सोळंके यांनी यावर सारवासारव केली. भाषणात बोललेले सत्य नाही. मला लाख म्हणायचे होते, पण मी चुकून कोटी म्हणालो. मला पक्षाने 40 लाखांचा निधी दिला होता. त्यातील 23 लाख रुपये खर्च झाले. उर्वरित पैसे मी पक्षाला परत केले. हा सगळा व्यवहार आरटीजीएसच्या माध्यमातून झाला होता. एक रुपयाही कॅशमध्ये खर्च केलेला नाही, असाही दावा त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT