Beed Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडेंसह 'त्या' दहा जणांना सहआरोपी करा; अंजली दमानिया यांच्या मागणीने खळबळ

Anjali Damania Mahayuti government Dhananjay Munde co-accused Beed Santosh Deshmukh murder case : बीड संतोष देशमुख हत्येप्रकरणात धनंजय मुंडेंसह दहा जणांना सहआरोपी करण्याची अंजली दमानिया यांची महायुती सरकारकडे मागणी केली.
Anjali Damania
Anjali DamaniaSarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh Case Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रमात धनंजय मुंडे यांचा सहभाग होता, असा गंभीर आरोप करत, त्यांच्यासह इतर दहा जणांना सहआरोपी करा, अशी मागणी केली आहे.

या खटल्याच्या दोषारोपपत्रात अनेक मुद्दे वगळण्यात आले असून, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी न्यायालयीन समिती आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधणार आहे. तसे संपूर्ण पुरावे देणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले.

अंजली दमानिया म्हणाल्या, "बालाजी तांदळे नऊ तारखेपासून पोलिसांबरोबर आरोपींचा शोध घेत होता. हे प्रकरण शेकायला लागलं, तेव्हा तो आरोपी वाल्मिक कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोचू नये, म्हणून या लोकांना अटक करून, तिथल्या तिथं हे प्रकरण निपटावे, यासाठी धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) प्रयत्न केले".

Anjali Damania
Prajakt Tanpure Allegations : भाजप आमदाराचं निवासस्थान अतिक्रमणात, कारवाई कधी? माजी मंत्री तनपुरेंनी प्रशासनाला 'घरगडी' म्हणत सुनावले

पोलिसांना बालाजी तांदळे यांनी 15 तारखेला लिहिलेले एक पत्र अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी दाखवले. पहिल्या दिवशी 9 तारखेपासून बालाजी तांदळे फिरत होते. त्यांना पत्र दिले 15 तारखेला. कुठचं पोलिस ठाणे, आरोपीच्या मित्राला पत्र देऊन सांगत की, तुझी गाडी घेऊन ये आणि आपण शोध सुरू करू. तर याच्यात धनंजय मुंडे यांचा दबाव होता. पोलिसांना दबाव होता. कार्यकर्त्यांना दबाव होता, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.

Anjali Damania
Ahilyanagar crime news : कत्तलसाठी डांबलेल्या गायींना सोडवणाऱ्या गोरक्षकांना दगडाचा जीवघेणा मारा; शिवसेना उपनेत्याविरोधात गुन्हा दाखल

बालाजी तांदळे स्वतः देशमुख कुटुंबियांना काय माहिती दिली यावर अंजली दमानिया म्हणाल्या, "पोलिसांनी आरोपीला शोधलेले नाही. आम्ही गाड्या फिरवल्या, दुसऱ्याला सांगितले 60-70 गाड्या, धनंजय देशमुखांना सांगितले 200 गाड्या, आम्ही आरोपींचा शोध घेतला, सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं, आणि प्रकरण त्यांच्यापर्यंत येऊ नये, हा यामागील उद्देश होता".

सहआरोपी करण्याची मागणी

अंजली दमानिया यांनी पहिली मागणी करताना, या सगळ्यांना सहआरोपी करा, दोषारोपपत्रात अनेक मुद्दे आलेले नाहीत. पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केली आहे, त्यांचे नाव नाही. जबाब नाही. लोकांची यादी आहे. त्यात राजेश महाजन, एलसीबीचे अधिकारी गीते हे, खंडणीच्यावेळी उपस्थित होते, त्यांचे नाव नाहीत. एलसीबीचे गीते यांनी या टोळीला प्रचंड मदत केली होती. संपूर्ण कल्पना होती की, संतोष देशमुख यांना उचलून नेलेलं आहे. तर हे सगळे सहआरोपी झाले पाहिजे, असे म्हटले.

मुंडेंसह यांना सहआरोपी करा

धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डाॅ. वायभासे आणि त्याची पत्नी, एसपी बारगळ,पीएसआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार, एलसीबीचे अधिकारी गीते या दहा जणांना सहआरोपी करा, त्यांचे जबाब घ्या,अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

मुख्यमंत्र्यांकडून मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न?

मला आलेली माहिती सात तारखेला पोलिस अधीक्षकांना पाठवली आहे. पुढे ती सीआयडीकडे पाठवली आहे. बालाजी तांदळे जास्त बोलण्यावर धनंजय मुंडे भडकले होते, त्यामुळे मुंडेंना याची सर्व कल्पना आहे. मुंडेंच्या माहितीत झाले आहे. अवादा कंपनीत झाले आहे. सातपुडा बंगल्यातील बैठकीला दोन पोलिस अधिकारी उपस्थित होते. या माहितीचा दोषारोपपत्रात उल्लेख नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का?, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com