Chhagan Bhujbal | Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Chhagan Bhujbal : 'साप साप म्हणून भुई धोपटणं...'; मंत्री मुंडेंच्या समर्थनार्थ भुजबळ मैदानात

Chhagan Bhujbal supports Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केले.

Pradeep Pendhare

Mumbai News : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण अजून तापलेले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड याचा देखील यात समावेश असल्याचा आरोप आहे.

यातून मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मंत्री मुंडेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहे.

छगन भुजबळ म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे संतोष देशमुख हत्याप्रकरणातील चौकशीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या चौकशीत जे समोरे येईल, त्यावेळी फडणवीस योग्य निर्णय घेतील. परंतु आता मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणे हे चुकीचे ठरेल. मंत्रिपद सहज मिळत नाही. आरोप करत 'साप साप म्हणून भुई धोपटणे' योग्य नाही, असे म्हणत मंत्री मुंडे यांच्या समर्थनार्थ भुजबळ उभ राहिले".

'मला कुणाचा राजीनामा घेऊन मंत्रीपद नको आहे. दुसऱ्याचा बळी घेऊन मी मंत्रीपद घेणाऱ्यांमधला नाही. जोपर्यंत कन्फर्म होत नाही. तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी का राजानीमा द्यावा? 'साप साप म्हणून भुई धोपटणे', योग्य नाही', असे सांगताना मी स्वतः अशा प्रकरणातून गेल्याचे सांगत छगन भुजबळ यांनी तेलगी प्रकरणाची आठवण करून दिली.

भुजबळ म्हणाले, "त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतो. तेलगी प्रकरण समोर आल्यानंतर मीच सर्व कायदेशीर कारवाई केली. प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर माझ्यावरच आरोप झाले. त्यानंतर मीच सर्वोच्च न्यायालयात गेलो. 'सीबीआय'कडे केस दिली. त्यावेळी केंद्रात वाजपेयी सरकार होते. काही नसताना खूप मनस्ताप झाला. पद गेलं. 2004 मध्ये पवारसाहेबांनी पुन्हा मंत्री केले". मी भोगलं आहे, कारण नसताना. त्यामुळे इथं मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली चौकशी सुरू आहे. चौकशीत सापडल्यावर मुख्यमंत्री त्यांना काय सांगायचे ते सांगतील, असेही भुजबळ यांनी म्हटले.

संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्घृणपणे झाली आहे. या हत्येचा निषेधच आहे. त्यातील आरोपींना फाशीच झाली पाहिजे. अशा क्रूरपद्धतीने खून करणाऱ्यांना माफी नाही. दोषींना शिक्षा होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही. तुमच्याकडे काही माहिती असेल, तर ती आणून द्या. त्यावर मुख्यमंत्री नक्कीच कारवाई करतील, असेही भुजबळ यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT