Shirdi Meals : साईभक्तांना भिकारी म्हणणाऱ्या विखेंना ठाकरेंची 'वाघीण' भिडली, म्हणाली...

Sushma Andhare On Sujay Vikhe Patil : शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या मोफत जेवणावरून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता राजकारण तापलं आहे. यावरून विरोधकांनी विखेंना निशाण्यावर घेतलं आहे.
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या मोफत जेवणावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच अख्ख्या राज्याने भिकारी शिर्डीत आले असून ते आपल्या झोळ्या भरून घेत असल्याचे म्हटलं होतं. तर संस्थानने मोफत जेवण बंद करावे असे वक्तव्य केलं होतं. त्यावर आता ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. त्यांनी थेट सुजय विखे यांची कानउघडनी करताना झापलं आहे. सध्या या प्रकरणावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.

सुजय विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानच्या मोफत जेवणावरून काल (ता.५) वक्तव्य केलं होतं. येथील मोफत जेवणामुळेच राज्यातील भिकारी शिर्डीत आले आहेत. येथील मोफत जेवन बंद करून ते २५ रूपयांनी द्यायला हवे. यामुळे मिळणाऱ्या पैसांतून किमान मुलांच्या शिक्षणावर खर्च करता येईल असे ते म्हणाले होते. यावरून आता गदारोळ सुरू झाला असून राजकीय वातावरण चांगेल चापले आहे. अनेकांनी या विधानाचा निषेध केला आहे. तर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना देखील यावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

आता या विधानाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली असून सुषमा अंधारे यांनी फेसबूकवर प्रीय सुजयजी अशी पोस्ट करत खडे बोल सुनावले आहेत. या पोस्टमध्ये अंधारे यांनी, सुजय विखे यांना टॅग देखील केलं आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंची कीर्ती आणि महती राज्यासह देशात आणि जगाभरात पसरली आहे.

यामुळे येथे जगभरातून भक्त येतात. ते दिलखुलासपणे दानधर्मही करतात. ज्यामुळे आज शिर्डीसंस्थानचे वार्षिक उत्पन्न सरासरी 850Cr आहे. याचे कारण साईभक्त असून ते स्नान से तन की शुद्धी; मंत्र से मन की शुद्धी और दान से धन की शुद्धी, मानणारे आहेत. हीच भारतीय परंपरा देखील असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.

Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil Video: 'महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत जमा होतात', भाजपच्या माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

तसेच आधी साई भक्तांना 10 रू कुपनवर भोजन मिळत होते. पणनंतर संस्थानाने देणगी वाढल्यानंतर भोजन सेवा मोफत केली. सुजयजी, शिर्डीतला अन्नप्रसाद तासन् तास रांगेत उभे राहून भक्तिभावाने ग्रहण केला जातो. हा प्रसाद ग्रहण करणारे फक्त गरिबीरेखेच्या खालचे किंवा मध्यमवर्गीय नाही तर धनाड्य लोकसुद्धा आहेत. यामुळे भक्तांनाच भिकारी म्हणणे हा उन्मत्तपणा बरा नव्हे, असे कानउघडनी केली आहे.

तसेच सुजय विखे यांनी, आपल्या विधानापासून घुमजाव करताना येणारे पैसे शिक्षणासाठी वापरले जावेत, असे म्हटले होते. त्यावरून देखील तिखट टीका केली आहे. अंधारे यांनी यावेळी, पद्मश्री विखे पाटील शिक्षण संस्थेचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा अभियांत्रिकी शिक्षण संस्था, नाशिक, लोणी, अहिल्यानगर, नाशिक, पुणे संगमनेर येथील शिक्षण संस्थांची नावे घेतली आहे.

येथील बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यू, मेडिकल इंजीनियरिंग, डेंटल, आयटीआय, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनर, डीएमएलटी, डीएड, बीएड, नर्सिंग शिक्षण प्रकारात किती मुलांना मोफत शिकवता..? असा सवाल केला आहे.

Sujay Vikhe Patil
Sushma Andhare News : संजय राऊतांनंतर आता अंधारे; मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत म्हणाल्या,'राजकारण म्हणजे...'

सुजय विखे आपण आपल्या संस्थेतील चौथी पाचवीच्या मुलांना सुद्धा एक ते दीड लाख रुपये शुल्क आकारता. निवासी शाळांमधून भोजनालय किंवा सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या लोकांना पाच ते सात हजार रुपयांवर राबवून घेता. तेंव्हा आपल्या उदात्त समाजकार्याचा दृष्टिकोन कुठे जातो? असा खोचक सवाल केला आहे.

जर खरंच गरजू गरीब मुलांना शिक्षण मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांच्या नावे सुरू असणाऱ्या आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमार्फत सुरू असणाऱ्या संस्थामधून प्रवेश द्या. त्यासाठी तुम्हीच पुढाकार का बर घेत नाही? असे आवाहन केले आहे.

सुजायजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी.. तुम्ही सुरू केलेलं हॉस्पिटल सतत गजबजलेलं असावं म्हणून साई संस्थानचे सर्व सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या रुग्णालयाला आणि तेथील मशीन्स चालवायला ऑपरेटर्स मिळत नाहीत. तुमच्या शाळेला विद्यार्थी मिळावे म्हणून संस्थानने बांधलेली शाळेची इमारत सुसज्ज असताना त्याचे लवकर उद्घाटन होऊ दिले जात नसल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.

Sujay Vikhe Patil
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil: लंकेंची 'खासदारकी' अडचणीत? उच्च न्यायालयाने दिले 'हे' महत्त्वाचे आदेश

तसेच सुजयजी तुमचा नेमका आक्षेप कशावर आहे? संस्थांमध्ये मोफत भोजन देण्यावर की या सगळ्या व्यवस्थेवर तुम्हाला पूर्णतः नियंत्रण मिळवता येत नाही यावर...? आता तर तुम्ही हद्द केली.. तुम्ही चक्क भक्तांना भिकारी म्हणलात. मग निवडणुकीच्या काळात दारोदार लोकांकडे मत मागणारे तुम्ही, स्वत:ला काय म्हणायला म्हणाल? असा सवाल केला आहे. अंधारे यांनी सुजयजी विखे यांना लवकर बरे व्हा..! असे म्हणत सबुरी दाखवण्याचा सल्ला देताना बाबा आपणास सन्मती प्रदान करो, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com