Dhananjay Munde In Banjara March Beed News Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : 'ज्या' समाजासाठी धनंजय मुंडे सरकारवर कडाडले, तोच समाज आक्रमक झाला; फक्त एका शब्दाने आंदोलन तापलं!

Banjara Community On Dhananjay Munde : राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. यापाठोपाठ बंजारा समाज देखील एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्याची मागणी करत आहे.

Aslam Shanedivan

  1. बंजारा समाजाने आरक्षणासाठी बीड शहरात महामोर्चा काढला

  2. बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करावे अशी मागणी केली

  3. यावेळी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी या मोर्चात सहभाग घेतला

Beed News : राज्यात सध्या आरक्षणावरून वाद उफाळला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा थांबताच ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. तसेच ज्या पद्धतीने सरकारने हैदराबाद गॅझेट मराठ्यांसाठी लागू केलं, तसेच ते बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी लागू करावे अशी मागणी केली जात आहे. यामागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे. यादरम्यान बीड शहरात बंजारा समाजाचा आरक्षण महामोर्चा काढण्यात आला यावेळी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी सहभाग घेतला. त्यांनी, बंजारा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली. मात्र आता हाच समाज मुंडे यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. बंजारा समाजाने मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गॅझेट मधील नोंदीच्या आधारामुळे मराठा समाजातील अनेकांना कुणबी दाखला (ओबीसी) मिळणार आहे. यामुळे आता ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून होत आहे. यामुळेच राज्यातील वातावरण तापले आहे.

याच मुद्द्यावरून बंजारा समाज देखील आता आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. हैदराबाद गॅझेटमधील नोंदीवरून एसटी प्रवर्गाचे आरक्षण दिले जावे अशी मागणी केली आहे. याच मागणीसाठी आज बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी या विराट मोर्चात मुंडे यांनी सहभाग घेतला. त्यांनी व्यासपीठावर जावून भाषण केले. त्यांनी बंजारा-गोरमाटी समाजाला एसटीचे आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा लढा थांबणार नाही आणि या लढ्यात मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील, अशी ग्वाही दिली.

मात्र याचवेळी त्यांनी वंजारा आणि बंजारा समाज एकच असल्याचे म्हटले. यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. या वक्तव्यानंतर बंजारा समाज आक्रमक झाला असून मुंडे यांनी आपली नेमकी भूमिका काय ती स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. तर मुंडे यांचे भाषण सुरू असतानाच बंजारा समाजाने जोरदार घोषणाबाजी करत वंजारा आणि बंजारा एक नाही, अशी घोषणाबाजी केली. बंजारा समाज आणि वंजारा समाज एक नसून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका करावी. समाज त्यांचा निषेध व्यक्त करतो, असेही समाजाने म्हटलं आहे. तर बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनीही मुंडेंच वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

1. धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाबाबत काय म्हणाले

-बंजारा समाज आणि वंजारा समाज एकच असल्याचे मुंडे म्हणाले.

2. मुंडेंनी हे वक्तव्य कुठे केले?

- बीडमधील सभेत हे वक्तव्य करण्यात आले.

3. बंजारा समाजाला आरक्षण कोणत्या मुद्द्यावर हवे आहे.?

- सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी हैद्राबाद गॅझेट लागू करावे या मुद्द्यावर बंजारा समाजाला आरक्षण हवं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT