Ashok Dak-Ajit Pawar News Beed Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar News : अशोक डक यांना भाजपात जाण्यापासून रोखण्यासाठी अजित पवारांच्या कार्यालयातून फोन!

In a political twist, the NCP has initiated efforts to prevent Ashok Dak from joining the BJP. A call from Ajit Pawar’s personal assistant. : अजित पवार यांच्या स्वीय सहायकांनी अशोक डक यांना संपर्क साधल्याची माहिती आहे. डक यांनी याला दुजोरा दिला.

Jagdish Pansare

Beed Political News : अजित पवार यांच्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष झालेल्या माजलगाव येथील अशोक डक यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेची दखल अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आली आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी असलेले मतभेद आणि पक्षाकडून होणारे दुर्लक्ष या कारणामुळे अशोक डक यांनी भाजपाशी जवळीक वाढवत पक्षप्रवेशाची तयारी सुरू केली आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी याची दखल घेत अशोक डक यांना संपर्क करायला लावून चर्चेसाठी बोलावल्याची चर्चा आहे.

रविवारी म्हणजे कालच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या स्वीय सहायकांनी अशोक डक यांना संपर्क साधल्याची माहिती आहे. डक यांनी याला दुजोरा दिला असून त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगीतले. डक यांचा माजलगाव आणि बीड जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढल्याचे बोलले जाते. माजलगाव मतदारसंघात मात्र डक आणि सोळंके परिवारातील वाद हा जुना आणि पांरपारिक समजला जातो.

राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या सुदंरराव सोळंके यांच्यापासून तो सुरू आहे. त्यांच्या दुसऱ्या पिढीत म्हणजेच प्रकाश सोळंके आणि अशोक डक यांच्यातही तो कायम आहे. स्थानिक पातळीवर या दोन नेत्यांमध्ये मतभेद दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि भाजपाला जिल्ह्यात चांगल्या नेतृत्वाची गरज असल्याने अशोक डक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसात अशोक डक हे मुंबईत भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या भेटीतच त्यांचा पक्षप्रेवशही निश्चित होणार आहे.

दुसरीकडे अशोक डक यांच्यासारखा जुना सहकारी पक्ष सोडून जाणे संघटनात्मक बळकटीच्या दृष्टीने नुकसानीचे ठरू शकते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यासारखा नेता अडचणीत सापडला. त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने जिल्ह्यात पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. अजित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारत पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा नीट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अशावेळी पक्षातला जुना आणि विश्वासू सहकारी मित्र पक्षाच्या वाटेवर असेल तर त्याला रोखलेच पाहिजे, या विचारातून डक यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

अजित पवार डक यांना रोखण्यात यशस्वी होतात? की मग डक भाजपाच्या गोटात सामील झालेले दिसतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. अजित पवार यांचे विश्वासू अशी ओळख असलेले अशोक डक भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चांना जिल्ह्यात काही दिवसापासून उधाण आले आहे. बीडमध्ये भाजपाही नव्या चेहऱ्याच्या शोधात असून डक यांना जिल्हा पातळीवर नेतृत्वाची संधी दिली जाणार असल्याचे बोलले जाते. अशोक डक हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT