Dhananjay Munde, Bajrang Sonawane Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : "...तर मी धनंजय मुंडेंचा जाहीर सत्कार करणार"; बजरंग सोनवणे असं का म्हणाले?

Jagdish Patil

Beed News, 13 Sep : राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं तर बीड जिल्ह्याचा खासदार या नात्याने मी त्यांचा सत्कार करेन, असं वक्तव्य बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे.

माध्यमांशी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, "बीड (Beed) जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा आहे. जिल्ह्यात कधी पाऊस कमी होतो तर कधी जास्त. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत शेती करावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होते.

राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शेतकऱ्यांसाठी काम करायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी मुंडे यांना दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं तर त्यांचा मी जाहीर सत्कार करेन असंही म्हटलं.

"बीडमधील एका गावात मुंडेंनी आश्वासन दिलं की, आम्ही 'एनडीआरएफ'चे सर्व निकष मोडून शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत सरसकट मदत करण्यात येणार आहे. त्यानंतर मी त्याच दिवशी सांगितलं की, पालकमंत्र्यांनी जर सरसकट'एनडीआरएफ'चे सर्व निकष मोडून शेतकऱ्यांना मदत केली, अनुदान दिलं तर मी बीड जिल्ह्याचा खासदार या नात्याने मी त्यांचा सत्कार करणार", असं सोनवणे (Bajrang Sonawane) म्हणाले.

लोकसभेप्रमाणे विधानसभेचा निकाल देण्यासाठी लोक उत्सुक

तर यावेळी त्यांनी विधानसभेसभेच्या निवडणुबाबत लोकांमध्ये उत्सुकता असल्याचंही म्हटलं. सोनवणे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीसाठी एवढी उत्सुकता लोकांमध्ये आहे की, कधी निवडणूक जाहीर होतेय आणि लोकसभेचा निकाल दिला त्या पद्धतीने बीड विधानसभेचा निकाल आम्ही कधी देतोय, यासाठी लोकांमध्ये उत्सुकता आहे.

लोकसभेपासून आमच्याकडे गर्दी होत आहे. उमेदवारीची मागणी होत आहे. त्यावर पक्ष योग्य तो निर्णय घेईल, योग्य उमेदवार देईल. पण अद्याप परळी मतदारसंघाबाबत पक्षाचा कोणताही निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT