Eknath Khadse : अखेर एकनाथ खडसेंनी सांगून टाकलं सीडीमध्ये काय होतं, म्हणाले, 'भाजप नेता मुलीसोबत...'

Eknath Khadse BJP CD : एकनाथ खडसे म्हणाले, त्यांनी ती क्लिप भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना देखील दाखवली. त्यांच्या मोबाईलमधून ती कशी गेली त्यांना माहीत नाही. पण शपथेवर सांगतो ती आपल्याकडे होती.
Eknath Khadse
Eknath Khadsesarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse News : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ खडसेंकडे असलेल्या साीडीची फार चर्चा झाली होती. भाजप सोडल्यानंतर एकनाथ खडसेंनी भाजप नेत्यांवर टीका करताना म्हटले होती की, त्यांचेकडे ईडी असेल तर माझ्याकडे सीडी आहे. वेळ आल्यावर आपण ती सीडी बाहेर काढणार. मात्र, ही सीडी कधी बाहेर आली नाही.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे यांनी आपल्याकडे खरचं सीडी होती का? याचे उत्तर दिले आहे. खडसे म्हणाले, ते ईडी म्हणाले म्हणून मी सीडी म्हणालो. यमक जुळवलं. मात्र माझ्याकडे काही कागदपत्रं, व्हिजव्हल (क्लिप) होते. ते मी भाजपच्य वरिष्ठ नेत्यांना देखील दाखवले.

त्या क्लिपमध्ये मुलीसोबत चालणारे चाळे वरिष्ठांना दाखवले. कोणाचे आहेत ते चाळे त्यांचे नाव सांगणार नाही', असे देखील एकनाथ खडसे म्हणाले.

माझ्या मोबाईलमधून ते कुठं गेलं, कसं डिलिट झालं हे मला देखील समजलं नाही. पण मी शपथेवर सांगतो की माझ्याकडे होतं. माझी मुक्ताईवर श्रद्धा आहे. मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो ते माझ्याकडं होतं. कस गेलं हे मला माहीत नाही, असे देखील खडसे म्हणाले.

Eknath Khadse
Vidhansabha election 2024: धनंजय मुंडे ऐकत नाही; मग राजकारणात राहायचं कशाला? भाजप आमदाराची खदखद

'तो' माणूस मॅनेज झाला

खडसे म्हणाले, त्यांनी ती क्लिप भाजपच्या दिल्लीतील भाजप नेत्यांना देखील दाखवली. त्यांच्या मोबाईलमधून ती कशी गेली त्यांना माहित नाही. पण ज्याने त्यांनी ही क्लिप दिली होती. त्याला देखील त्या लोकांनी मॅनेज केले. प्लॅट दिला, पाच दहा कोटी काय दिलेत माहीत नाही. आता तो माणूस त्यांच्यासोबत आहे. दोन प्लॅट 20-25 कोटीची प्राॅप्रर्टी त्याची आहे.

Eknath Khadse
Ajit Pawar And Supriya Sule : महायुतीत अजितदादा एकटे पडलेत; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'तो भाजप...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com