Ncp Letter To Collector News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Ncp News : औरंगजेब, मुघल शासकांनी बांधलेल्या वास्तुंचा जिर्णोधार करा, राष्ट्रवादीची मागणी..

Aurangabad : जी-20 अंतर्गत शहराच्या सुशोभीकरणामध्ये व स्मार्ट सिटीच्या बजेटमध्ये या किले-ए-अर्कचा समावेश करावा.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभु राम, रावण, छत्रपती शिवाजी महाराज, मुघल, आदिलशाही अशा सर्वांचा उल्लेख करत केलेल्या ट्वीटवरचा वाद शमत नाही, तोच राष्ट्रवादीने आणखी एक नवा वाद ओढावून घेतला आहे.

`रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा. (Collector) आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. (Ncp) इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वातंत्र्यलढा समजावून सांगा, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

यावरून अजूनही त्यांच्यावर टीकेची झोड सुरूच आहे. हे कमी की काय? म्हणून आता राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या किरमाणी यांनी जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांना निवेदन देत औरंगजेबाने बांधलेल्या परंतु सध्या दुरावस्थेत असलेल्या वास्तुंचा जिर्णोधार करावा, अशी मागणी करणारे पत्र दिले आहे.

इलियास किरमाणी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, शहरातील किले-ए-अर्क हा मुघल शासक 'सम्राट औरंगजेब' ने सन १९६० मध्ये बांधला होता. आज तो महाल-राजवाडा जीर्णावस्थेत पडून आहे. या महालाचे कालांतराने नुकसान झाले असून, शासनाच्या निष्काळजीपणामुळे त्याने गतवैभव गमावले आहे. या परिसरात शाही मस्जिद, आदिल दरवाजा, झेबुन्निसा महाल, पाल्मार कोठी, जनाना महाल, जनाना मस्जिद व मर्दाना महालचा समावेश आहे.

किले-ए-अर्कमध्ये आजही आलिशान महाल, सुंदर मोगल गार्डनचे अवशेष, राज सिंहासनची जागा, दिवान ए-आम, दिवानची खास जागा, मंत्र्यांचे दालन, शयनकक्ष व हमाम खानेचे अवशेष आज देखील उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की, जी-20 अंतर्गत शहराच्या सुशोभीकरणामध्ये व स्मार्ट सिटीच्या बजेटमध्ये या किले-ए-अर्कचा समावेश करावा.

देखभालीचा अभाव असल्याने या महालाची स्थिती बिघडली आहे. एकेकाळी हे अतिशय सुंदर स्मारक होते. त्याचे संवर्धन व्हावे, त्यांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्याची आज अत्यंत गरज आहे. या वास्तू आपल्या ऐतिहासिक शहराचे आणखी एक पर्यटन स्थळ बनू शकते, असेही इलियास किरमाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT