Chandrakant Khaire News : बोरनारे यांनी लोकांना पैसे देवून सभेत घुसवले ; खैरेंचा थेट आरोप..

Shivsena : उत्तर आम्ही देवू शकलो असतो, पण आदित्य ठाकरे यांची सभा असल्याने आम्ही गप्प बसलो.
Mla Bornare-Chandrakant Khaire News, Aurangabad
Mla Bornare-Chandrakant Khaire News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray : युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या कालच्या महालगाव येथील शिवसंवाद सभेत वैजापूरचे गद्दार आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी पैसे देवून माणसं घुसवली होती, असा गंभीर आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा, असा निर्वाणीचा इशारा देखील त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिला.

Mla Bornare-Chandrakant Khaire News, Aurangabad
Aditya Thackeray News : बोरनारेंना विरोध झाला त्याच महालगावांत ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक ?

एकीकडे खैरे, (Chandrakant Khaire) दानवे कालच्या प्रकारामागे आमदार बोरनारे असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार यांनी तर अशी कुठलीही दगफेक सभा किंवा आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) गाडीवर झाली नसल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दानवे आणि खैरे यांनी मात्र या निमित्ताने आमदार बोरनारे यांच्यावर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. खैरे म्हणाले, वैजापूरचे शिंदे गटाचे गद्दार आमदार रमेश बोरनारे यांनीच लोकांना पैसे देऊन या कार्यक्रमात सोडले होते, त्यांनीच गोंधळ घातला. गद्दार आमदारांनी हा प्रकार घडवून आणला आहे.

बोरनारे यांनी मुद्दाम एका मिरवणूकीत काही लोकांना घुसवले, त्यांना दारू पाजली. मग त्या लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. या प्रकाराचे उत्तर आम्ही देवू शकलो असतो, पण आदित्य ठाकरे यांची सभा असल्याने आम्ही गप्प बसलो, असेही खैरे म्हणाले.

तर दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या घटनेला स्थानिक पोलीस जबाबदार असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंसारख्या महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या सुरक्षेत पोलिसांच्या गाफीलपणामुळे अशा प्रकारची घटना घडल्याचा आरोप केला.

दगडफेक करण्याएवढी हिंमत रमेश बोरनारेंमध्ये नाही, त्यांच्या समर्थकांचे हे कृत्य असू शकते, अशी शंका देखील त्यांनी उपस्थितीत केली. या संपुर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी व ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करावी यासाठी दानवे यांनी पोलिस महासंचालकांना पत्र पाठवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com