Jitendra Awhad News
Jitendra Awhad News  Sarkarnama
मराठवाडा

Jitendra Awhad News : 'त्या' बॅनरवर 'पळकुट्यांनो नाव लिहायचे ना' ; जितेंद्र आव्हाडांचा सल्ला

Dattatrya Deshmukh

Sharad Pawar Public Meeting In Beed : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारा यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा घडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टोलेबाजी केली. पळकुट्यांनो बॅनरवर नाव लिहायचे ना, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही चांगलीच फिरकी घेतली. तुमच्या बॅनरमुळे आमचे अर्धे काम झाल्याचे सांगत त्यांनी अजित पवार गटाला चिमटा काढला.

शरद पवार यांच्या बीड येथील स्वाभीमानी सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवर शरद पवार व अजित पवार यांचे फोटो असलेले मोठे बॅनर लावण्यात आले होते. 'साहेब बीडमध्ये आपले स्वागत आहे, कामाच्या माणसाला आशिर्वाद द्या,' जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सदैव अजित पवारांसोबत,' असा मजकूर त्यावर होता. त्यामुळे या बॅनरची सभास्थळी एकच चर्चा झाली.

याचा बॅनरवरून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी खरपूस समाचार घेतला, पवारांचा फोटो वापरायचा आणि दिशाभूल करायची असे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी "शहरात पवारांचे फार बॅनर लावले आहेत. यातून त्यांनी आमच्या विजयाचे काम अर्धे केले आहे. त्यांना पवारांच्या आशीर्वादाची गरज आहे, हे ऐकून फार समाधान झाले'' असा टोला आपल्या खास शैलीत लगावाला.

पवारसाहेबांच्या सभेवेळी मुंडेंच्या समर्थकांनी केलेल्या बॅनरने लक्ष वेधून घेतले. त्यांनी लावलेले बॅनर आणि त्यावर आव्हाड, पाटील यांची टोलेबाजीमुळे पवारांच्या बीडच्या सभेत बॅनर हा विषय केंद्रस्थानी राहिला. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले फोटो वापरू नयेत असा इशारा अजित पवार गटाला दिला होता. मात्र, तरिही त्यांचे फोटो वापरले जात आहेत. पवार यांच्या सभेमुळे मोठी वातावरण निर्मीती होईल. त्यामुळे या सभेची धार कमी करण्यासाठीच या बॅनरचा खटाटोप होता का? अशी चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात झाली.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT