Sandeep Kshirsagar Political News : शरद पवारांची 'ती' शाबासकी अन् संदीप क्षीरसागरांचा 'कॉन्फिडन्स' दसपटींनी वाढला

Sharad Pawar Beed NCP Rally News : बीड जिल्ह्यातील राजकारण आजपर्यंत नेहमीच काका-पुतण्याच्या वादावरून चर्चेत राहिले आहे.
Sandeep Kshirsagar - Sharad Pawar- Dhananjay Munde
Sandeep Kshirsagar - Sharad Pawar- Dhananjay Munde Sarkarnama

Beed : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीनंतर नव्याने पक्षबांधणीसाठी अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. बंडखोर नेत्यांच्या विरोधात दंड थोपटताना त्यांच्याच मतदारसंघात सभांचा धडाका लावला आहे. छगन भुजबळांच्या येवल्यात पवारांची तोफ धडाडल्यानंतर त्यांची दुसरी सभा अजित पवार गटाचे फायरबॅंड नेते धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये झाली.

पवारांनी धनंजय मुंडेंना 'टार्गेट' करतानाच जिल्ह्यात मुंडेंना पर्यायी नेता म्हणून संदीप क्षीरसागरांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले. बीडच्या माजी खासदार केशरकाकूंच्या राजकीय निष्ठेचा दाखला देत पवारांनी आमदार संदीप क्षीरसागरांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. खुद्द पवारांनी बीडमध्ये येऊन बळ दिल्याने क्षीरसागरांना बारा हत्तीचे बळ चढले असावे हे निश्चित. त्यातून भविष्यात ते मुंडेंना 'फाइट' देऊ शकतील असे आडाखे बांधले जात आहेत.

Sandeep Kshirsagar - Sharad Pawar- Dhananjay Munde
Sharad Pawar Beed Sabha : पवारांकडून क्षीरसागरांचे कौतुक, मोदींवर निशाणा ; पण मुंडेंना सोडले..

बीड जिल्ह्यातील राजकारण आजपर्यंत नेहमीच काका-पुतण्याच्या वादावरून चर्चेत राहिले आहे. आधी गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे आणि आता जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर(Sandeep Kshirsagar) यांच्यामुळे बीडचे राजकारण गाजले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंडे कुटुंबातील काका-पुतण्याचे वाद संपले. मात्र, जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील वाद अजूनही चर्चेत आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरच्या नाराजीतून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने याच मतदारसंघातून २०१९ ला संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बीड मतदारसंघातली लढत काका - पुतण्यातली लढत झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधलं संदीप क्षीरसागर यांचं वजन वाढल्याने जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेले.

Sandeep Kshirsagar - Sharad Pawar- Dhananjay Munde
Sandeep Kshirsagar Speech : शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांच्या पायाशी राहीन; संदीप क्षीरसागरांचे भावनिक भाषण

पण त्यांचे सगळे विरोधक त्यांच्या विरुद्ध एकवटले आणि त्यांनी संदीपची पाठराखण केली. मराठा समाज हा संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने उभा आहे. तर जयदत्त क्षीरसागर यांच्या बाजूने भाजपचे परंपरागत मतदार, कट्टर शिवसैनिक आणि त्यांचे स्वतःचे समर्थक उभे राहिल्याचे पाहायला मिळाले होते. या निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार यांच्यासह धनंजय मुंडेंनी पूर्ण ताकद पाठिशी उभी केल्याने काका जयदत्त क्षीरसागरांना चारीमुंड्या चीत करत संदीप क्षीरसागर 'जायंट किलर' ठरले. या विजयामुळे ते राज्याच्या राजकारणात चर्चेत आले होते.

राष्ट्रवादीतील फुटीआधी बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे(Dhananjay Munde) आणि संदीप क्षीरसागरांची जोडी जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व राखून होती. काका जयदत्त क्षीरसागरांनंतर धनंजय मुंडेंसोबत राहून संदीप क्षीरसागरांनी आपले राष्ट्रवादीतील वजन वाढवले. त्यांना शरद पवारांच्या तरबेज नजरेने हेरले. त्यांना बीड शहरासह जिल्ह्याच्या राजकारणात कार्यरत राहण्यासोबतच जनसंपर्क वाढविण्यावर जोर देण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पण अजित पवारांच्या २०१९ च्या पहिल्या बंडात धनंजय मुंडेंसह तेही होते. पण त्यांनी तत्काळ परतीची वाट धरत आपण पवारांसोबत असल्याची भूमिका जाहीर केली.

Sandeep Kshirsagar - Sharad Pawar- Dhananjay Munde
Jayant Patil Shayari : जयंत पाटलांची शायरी अन् शरद पवारांची दाद; सभेत एकच हशा, नेमके काय घडले ?

त्यानंतर आता अजित पवारांनी पुन्हा जुलै महिन्यात बंडांचे निशाण फडकवले. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील गेले. त्यामुळे जिल्ह्यात धनंजय मुंडेंना पर्यायी चेहरा म्हणून पवार बीडच्या सभेत आपला पत्ता उघडणार हे निश्चित होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी संदीप क्षीरसागरांचे कौतुक करतानाच भविष्यात धनंजय मुंडेंना पर्यायी म्हणून देखील त्यांना पाठबळ दिले आहे.

आता या सभेनंतर आमदार संदीप क्षीरसागर जिल्ह्याच्या राजकारणात ' टॉपचा गिअर' टाकणार असल्याची चर्चा आहे. जितेंद्र आव्हाडांनीही सभेत आगामी निवडणुकीत खांद्याला खांदा लावून मी तुझ्यासोबत लढेन, असा शब्द पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांना दिला. दरम्यान, बबन गिते, शंकर बांगर यांच्यासह बीड जिल्हा पुन्हा एकदा हलवून टाकू असा इशाराही दिला. पण आता यापुढे क्षीरसागरांसमोर कडवे आव्हान अजित पवार गटाचे नेते आणि एकेकाळचे त्यांचे मित्र धनंजय मुंडेंचेच असणार आहे. त्यामुळे मुंडेंचे आव्हान मोडीत काढणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com