Shivraj Bangar-Dhananjay Munde News Beed Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde-Shivraj Bangar : वाल्मीक कराड कोणाच्या संपर्कात ? बापू आंधळे खूनाचा कट कुठे शिजला ? याचाही सीडीआर काढा!

After Sandeep Kshirsagar was named, the NCP (Sharad Pawar faction) launched a strong reaction, demanding the CDR details related to the Santosh Deshmukh and Bapu Andhale murder case. : आता तुमचे कवेळ पाच टक्केच बाहेर काढले आहे, आणखी काढले तर तुम्हाला तोंड लपवून बसावे लागेल, असा इशाराच शिवराज बांगर यांनी दिला.

Jagdish Pansare

Beed Political News : बीड लैगिंक अत्याचार प्रकरणातील आरोपींचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी थेट संबंध जोडत धनंजय मुंडे यांनी आरोप केले. आरोपींचे सीडीआर, स्पाॅट आयडेंटिफिकेशन तपासा, यासह प्रकरणाची एसआयटी समिती स्थापन करून चौकशी करा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली. संदीप क्षीरसागर यांचे नाव घेत आमचं तुम्ही सगळंच काढलं, असा संताप मुंडे यांनी व्यक्त केला होता.

यावरून आता बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये (NCP) संघर्ष भडकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक पदाधिकारी शिवराज बांगर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. संदीप क्षीरसागर यांच्या सीडीआरची मागणी करणाऱ्या धनंजय मुंडे यांचाही सीडीआर काढा. वाल्मीक कराड कोणाच्या संपर्कात होता? बापू आंधळेच्या खूनाचा कट कुठे शिजला? करुणा मुंडे यांच्या गाडीत बंदूक कोणी ठेवली? हे ही तपासा.

आता तुमचे कवेळ पाच टक्केच बाहेर काढले आहे, आणखी काढले तर तुम्हाला तोंड लपवून बसावे लागेल, असा इशाराच शिवराज बांगर यांनी दिला. तुम्हाला अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावर तुम्ही बोलायला पाहिजे होतं. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बोलले त्यांचे अभिनंदन. पण संदीप क्षीरसागर यांच्या सीडीआरची मागणी करत असताना सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड 21 दिवस कुणाच्या संपर्कात होता? याचे देखील सीडीआर बाहेर आले पाहिजे, असे बांगर म्हणाले.

परळीत सरपंच बापू आंधळे यांचा झालेला खून, त्याचा कट कुठे शिजला, करुणा मुंडे यांच्या गाडीत बंदूक कोणी ठेवली? या सगळ्या घटनांच्या काळातील सीडीआर देखील तपासले पाहिजे. धनंजय मुंडे तुमचे केवळ पाच टक्के काढले गेले. आणखी काढले तर पंधराशे दिवस तुम्ही घरात लपून बसाल, असा इशारा बांगर यांनी दिला. बापू आंधळे यांच्या खूनाचा कट कोणाच्या कार्यालयात रचला गेला, महादेव मुंडे यांचा खून तहसील कार्यालयासमोर झाला. वीस महिने उलटून गेले तरी अद्याप आरोपी सापडत नाहीत. आरोपी कोण आहेत? हे सगळ्यांना माहित आहे, त्या आरोपींचे धनंजय मुंडे यांच्याशी काय संबंध आहेत? याचे सीडीआरही बाहेर आले पाहिजेत, अशी मागणी बांगर यांनी केली.

बीड जिल्ह्यातील खाजगी कोचिंग क्लासमध्ये दोन शिक्षकांनी नीटच्या परिक्षेची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याने खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून या दोन्ही शिक्षकांविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांनी आरोपी शिक्षक विजय पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT