Sharad Pawar, Nitin Gadkari  Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar Appreciated Nitin Gadkari : मोदी सरकारमधील कोणता मंत्री तुम्हाला आवडतो ? ; शरद पवारांनी घेतलं 'हे' नाव..

Sharad Pawar on Nitin Gadkari : सरकार तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही काही तरी रिझल्ट दिला पाहिजे. त्यात गडकरी आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sambhaji Nagar News : मोदी सरकारला नुकतीच नऊ वर्ष पूर्ण झाली आहे. या सरकारमधील कोणता मंत्री तुम्हाला आवडतो, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी बुधवारी विचारला, तेव्हा पवारांनी मोदी सरकारमधील एका मंत्र्याचं तोंडभरुन कौतुक केलं. पवार आज (बुधवारी) संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील दंगली, हिंसाचार आणि लव्ह जिहाद सारख्या घटनांवर त्यांनी भाष्य केलं.

शरद पवार म्हणाले, "काही लोकांचं काम वादातीत नाही.उदा. नितीन गडकरी. विकासाच्या कामात नितीन गडकरी यांचा रस असतो.सरकार तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही काही तरी रिझल्ट दिला पाहिजे. त्यात गडकरी आहे,"

"गडकरींचं वैशिष्ट्ये म्हणजे ते पक्षीय दृष्टिकोण ठेवत नाही. त्यांच्यासमोर एखादा प्रश्न मांडला तर कोण सांगतो या पेक्षा प्रश्न किती महत्त्वाचा आहे हे ते पाहतात. ही समंजसपणाची गोष्ट आहे. अशा प्रकारचा अनुभव त्यांच्याबद्दलचाच आहे," असे म्हणत पवारांनी नितीन गडकरींच्या कामाचे कौतुक केले.

"राज्यात आणि देशात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. पण कारण नसताना लव्ह जिहादसारख्या नाही त्या प्रश्नांना फाजील प्रश्नांना महत्त्व दिलं जातं आहे.समाजा-समाजात तेढ वाढवली जात आहे. या सगळ्या गोष्टींना मीडियानेही फार प्रसिद्धी देऊ नये.” असे पवार म्हणाले.

"देशात आणि राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना फाजील प्रश्नांना महत्त्व दिलं जातं आहे. केरळमध्ये चर्चेसवर हल्ले झाले. ख्रिश्चन समुदाय हा शांत स्वभावाचा असतो. समजा जर एखाद्याची चूक झाली असेल तर चर्चवर हल्ला करण्याचं कारण काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या सर्व हल्ल्यांमागे एक विशिष्ट विचारधाराही दिसून येते. ती विचारधारा देशहिताची नाही. आदिवासी आणि दलित समाजांना जपणं हेही राज्य आणि केंद्र सरकारचं काम आहे," असे पवार म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT