MLA Sandeep Kshirsagar Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडचं 'मास्टर माईंड', 'व्हीआयपी' ट्रीटमेंट का? आमदार क्षीरसागरांचा घणाघात

NCP Sharad Chandra Pawar party MLA Sandeep Kshirsagar Walmik Karad Dharashiv Beed Santosh Deshmukh murder case : धाराशिव इथं बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार संदीप क्षीरसागर यांचं वाल्मिक कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर संतापले.

Pradeep Pendhare

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींविरुद्ध 'मोकाका' लावण्यात आला आहे. परंतु खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड याला यातून वळगण्यात आलं आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) म्हणाले, "पहिल्या दिवसांपासून ओरडत आहे, यात वाल्मिक कराडचं नाव आलं पाहिजे. सभागृहात देखील यावर आवाज उठवला होता. कटकारस्थानाचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड आहे. 'काॅल रेकाॅर्ड' तपासले, तर सर्व गोष्टी समोरासमोर येतील". एकीकडे कारवाई होत असतानाच, दुसरीकडे त्याला 'व्हीआयपी ट्रीटमेंट' दिली जात आहे. सरेंडर होण्याचा प्रकार त्यातील होता, असा गंभीर आरोप आमदार क्षीरसागर यांनी केला आहे.

'सरेंडर झाल्यानंतर त्याला 'व्हीआयपी' ट्रीटमेंट आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सुरवातीलाच सांगितले होते की, तो माझा निकटवर्तीय आहे. त्यातूनच त्याला कुठेतरी संरक्षण दिलं जात आहे. धाराशिवमध्ये निघालेल्या मोर्चा हा मोर्चा, त्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आहे. या कुटुंबियांला न्याय देण्यासाठी मास्टरमाईंडला फाशी मिळेपर्यंत गप्प बसणार नाही', असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी दिला.

'मंत्री मुंडेंकडून मिळत असलेल्या संरक्षणावर बोलताना आरोपी वाहनातून येतो. सरेंडर होतो. मग कुठेतरी संरक्षण दिलं जात असल्याचे भावना दिसते. तसं पाहिल्यास महाराष्ट्रातील ही पहिली केस असेल की, आरोपी वाहनातून येऊन सरेंडर होतो. वाल्किक कराड याचे नाव 'मोकाका'बरोबर हत्येत आणि त्याच्या कटकारस्थानमध्ये आले पाहिजे', अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली.

वाल्मिक कराड याला 'मोकाका'तून वगळलं...

संतोष देशमुख यांच्या हत्येत असलेले सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, कृष्णा आंधळे या आठ जणांविरोधात 'मोकाका' अंतर्गत कारवाई झाली आहे. खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला 'मोकाका'तून वगळण्यात आलं आहे. तर हत्येतील कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याला बीड पोलिसांनी वाँटेड घोषित केलं आहे. दरम्यान, विष्णू चाटे याला न्यायालयाने दोन दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. 13 जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT