Supriya Sule, Eknath Shinde Latest News sarkarnama
मराठवाडा

Supriya Sule News : लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर निर्णय घ्या ; सुप्रिया सुळेंची सरकारला सूचना

Mangesh Mahale

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मराठा, धनगर ,मुस्लिम, लिंगायात समाजाची आरक्षण संदर्भात भाजपाने फसवणूक केल्याचा आरोप केला.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या ही राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. "मराठा आरक्षणासाठी घटनेत बदल करावा लागेल, लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर निर्णय घ्या," असे त्यांनी सरकार सुचवले. पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

काही वर्षांपूवी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांनी बारामतीत आमच्या घरासमोर आंदोलन केले होते. 'आमचे सरकार आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देऊ,' असा शब्द त्यांनी दिला होता, पण राज्यात आणि केंद्रात त्यांची भूमिका वेगळी असते," असा टोला त्यांनी लगावला.

राष्ट्रवादीच्या फुटीवर विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीच फुट पडलेली नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब आहेत तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. फक्त नऊ आमदार आणि दोन खासदारांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे, त्यांच्या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो आहोत,"

"राज्यात दुष्काळाचे सावट आहे, शेतकरी हवालदिल झाला असून, चारा छावण्या सुरू करण्यासाठी सरकारची कुठलीही तयारी दिसत नाही," अशी खंत सुळेंनी व्यक्त केली. सत्ताधारी हे विरोधकांशी चर्चा करायला घाबरतात, असे त्या म्हणाल्या. आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, महेबुब शेख उपस्थित होते.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT