Neelam Gorhe On Sanjay Raut News Sarkarnama
मराठवाडा

Neelam Gorhe On Sanjay Raut : आरोपी व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकावर काय भाष्य करायचं?

Neelam Gorhe slams Sanjay Raut, questioning his credibility over writing a book while facing serious allegations in the Patra Chawl scam and money laundering case. : संभाजीनगरचा पाणी प्रश्न रखडण्यामागे झारीतील शुक्राचार्य कोण? हे सर्वांनाच माहीत आहे, असे म्हणत नीलम गोऱ्हे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला.

Jagdish Pansare

Shivsena News : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या तुरुंगातील अनुभवावर लिहलेल्या पुस्तकाने प्रकाशनाआधीच राज्याच्या राजकारणात धुमाकूळ घातला आहे. संजय राऊत यांनी या पुस्तकातून अनेक धक्कादायक खुलासे आणि दावे केले आहेत. राजकीय क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया उमटत असताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ' आरोपी व्यक्तीने लिहलेल्या पुस्तकावर काय भाष्य करायचे? असे म्हणत अधिकचे भाष्य टाळले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मनी लाॅन्ड्रींग आणि पत्राचाळ प्रकरणात आरोप झालेले आहेत. त्यांना त्यासाठी जेलमध्येही जावे लागले. अशा आरोपी व्यक्तीने लिहलेल्या पुस्तकाला काय महत्व द्यायचे? असेही गोऱ्हे म्हणाल्या. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल निघालेल्या हल्लाबोल मोर्चावरही त्यांनी टीका केली.

संभाजीनगरचा पाणी प्रश्न रखडण्यामागे झारीतील शुक्राचार्य कोण? हे सर्वांनाच माहीत आहे, असे म्हणत नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरच्या पाणी प्रश्नासाठी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. नेमका हाच मुहूर्त साधत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यादेखील संभाजीनगरात होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 'लबाडांनो पाणी द्या' आंदोलनावर गोऱ्हे यांनी भाष्य केले.

शहराचा पाणी प्रश्न रखडण्यामागे झारीतील शुक्राचार्य कोण? हे सर्वांना माहीत आहे. स्थानिक सर्वेसर्वा असलेल्या नेत्यामुळेच पाणी योजना रखडल्या, असा आरोप करत नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे बोट दाखवले. खरे लबाड कोण? हे जनतेने 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले, असा टोलाही त्यांनी लगावला. महायुतीला मिळालेले यश यात लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. या योजनेच्या पैशाचा महिला कसा उपयोग करतात, याबाबत सर्वेक्षण करणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

या सर्वेक्षण अहवालानंतरच महिलांच्या सबलीकरणासाठी आणखी काय करता येईल? याचा विचार केला जाईल. एखादी योजना राबवताना त्यासाठी इतर विभागाचा निधी वळवला जातो, असा मुद्दा येत असतो. पण चांगल्या योजनांसाठी पुढे जावे लागते, असे म्हणत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर नीलम गोऱ्हे यांनी अधिक भाष्य करणे टाळले. संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकावर प्रश्न विचारला असता संजय राऊत हे मनी लॉन्ड्रीग आणि पत्रा चाळ प्रकरणात जेलमध्ये राहून आलेले आहेत. अशा आरोपी व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकावर आपण भाष्य करणार नाही, असे त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT