
Mumbai News, 17 May : 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक प्रकाशनाआधीच चर्चेत आलं आहे. त्याची कारणे आता समोर येऊ लागली आहेत. या संदर्भात या पुस्तकाचे लेखक असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक बोल्ड स्टेटमेंट केलं आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन आज जेष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रकाशनाच्या पूर्वसंध्येला खासदार राऊत यांनी याबाबत आपले मन मोकळे केले. त्यांनी एका मुलाखतीत बोलताना भाजप आणि अमित शाह यांच्याबाबात अतिशय धक्कादायक विधाने केली आहेत.
देशाच्या इतिहासात अनेक नेते होऊन गेले. त्यांनी आपल्या विरोधकांचा समाचार घेतला. मात्र विरोधकांना निवडणुकीत पराभूत करून राजकीय हिशेब चुकता करण्याची पद्धत होती. भारतीय जनता पक्ष आणि अमित शहांनी मात्र विरोधकांना क्रूर पद्धतीने नष्ट करण्याचा प्रकार सुरू केला. त्याचे देशभरात शेकडो नेते बळी ठरलेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे किंवा अन्य विरोधी पक्षांची संबंध कधीही वाईट नव्हते. अमित शाह दिल्लीच्या राजकारणात आल्यानंतर हे सर्व सुरू झालं. अमित शहांचे काम म्हणजे विरोधकांना 'खतम करा' असे आहे. आपली सत्ता बळकट करण्यासाठी त्यांनी अतिशय निर्घृण पद्धत वापरली. ही या देशाची लोकशाही किंवा राजकीय संस्कृती नाही अशी व्यवस्था देशात कधीही नव्हती, असंही राऊत म्हणाले.
तर 'अमित शहा हे नेते नाहीत' असं वक्तव्य देखील खासदार राऊत यांनी केलं. ते म्हणाले, अमित शहा देशातील विरोधकांना संपविण्याच्या कारस्थानाचे मास्टरमाईंड आहेत. ते पंतप्रधान मोदी यांचे 'येस मॅन' किंवा 'बॅक रूम बॉय' म्हणता येतील. उद्या ते देशाचे गृहमंत्री नसतील तर त्यांनीच सांगावे ते काय असतील. कदाचित ते या देशातही राहणार नाहीत.
दिल्लीत सात माजी केंद्रीय गृहमंत्री राहतात. चार माजी उपराष्ट्रपती राहतात. म्हणून जनतेने ते नेते आहेत, असे गृहीत धरता येत नाही. कोणत्याही पदावर नसतानाही जनमानसात त्यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा नेता म्हणून असलेले फार थोडे आहेत. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.