Neelam Gorhe On Supriya Sule : नीलम गोऱ्हेंची 'NCP' एकत्र येण्यावर सुळेंना सूचक 'मेसेज'; 'स्थानिक'मध्ये महायुतीचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार

Shiv Sena Neelam Gorhe Sends Subtle Message to Supriya Sule on NCP Unity in Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर असतानाच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Neelam Gorhe On Supriya Sule
Neelam Gorhe On Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Neelam Gorhe NCP unity reaction : शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर बोलताना, त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंकडे सूचक असा मेसेज दिला आहे.

खासदार सुळे आमच्याबरोबर आल्या, तर आनंदच होईल. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील! परंतु अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यायचा आहे. उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर त्यांनी भाष्य केलं नाही. तसेच लाडक्या बहि‍णींनी 2100 रुपये देण्याचा निर्णय सरकार योग्य वेळी घेईल, अशीही माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

उपसभापती नीलम गोऱ्हे या अहिल्यानगर दौऱ्यावर होत्या. त्या म्हणाल्या, "राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून दीड हजार रुपये महिना सुरू असून, वाढीव मदतीसाठी महिलांनी कोठे मोर्चे काढलेले नाहीत. सध्या सरकार समोर अवकाळी पावसासह अन्य प्रश्‍न असून, ज्यावेळेस शक्य होईल, त्यावेळेस लाडक्या बहिणींना 2 हजार 100 रुपये प्रमाणे मदत देणार आहोत. त्यामुळे या विषयात कोणीही महिलांची दिशाभूल करू नये". तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार (Ajit Pawar) एकत्र निर्णय घेतील, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

Neelam Gorhe On Supriya Sule
Ahilyanagar BJP news : मंत्री विखेंनी हेरलंय शहराध्यक्ष पदासाठी 'OBC' कार्ड; संधी मिळणार की, निष्ठावंतांच्या नावाखाली..?

गोऱ्हे म्हणाल्या की, "लाडक्या बहिणींसह विविध घटकांमुळे महायुतीला (Mahayuti) विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग महत्त्वाचा असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. ज्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढणे शक्य आहे, त्या ठिकाणी एकत्र निवडणुका लढण्यात येतील. ज्या ठिकाणी शक्य होणार नाही, त्या ठिकाणच्या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील".

Neelam Gorhe On Supriya Sule
Amit Shah Controversy : 'अमित शाह 'मातोश्री'च्या दारात घामाघूम होऊन उभे होते...बाळासाहेबांनी वाचवलं', संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

'अहिल्यानगर महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करत, नगर जिल्हा परिषद निवडणुकीतही शिंदे गट चांगले यश मिळवणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस बरसत असून, या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधीची मागणी ही करण्यात आली', असेही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. महिला व बालकल्याणच्या उपक्रमांसाठी जिल्हा नियोजन समितीत 25 कोटींचा निधी राखीव ठेवावा, अशी सूचना केली. प्रत्येक तालुक्यात भरोसा सेल सुरू करावेत. तिथं सुनावणी इन कॅमेरा घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com