Shivraj Motegaonkar  Sarkarnama
मराठवाडा

NEET Paper Leak: 'नीट' पेपरफुटी प्रकरण: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचा मोटेगावकर कुटुंबाला मोठा दणका; मुलगा आदित्यवर दोन वर्षांची बंदी

NEET controversy News: सीबीआयकडून सध्या NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून वेगानं सुरू आहे. आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरची नीटचा पेपर फोडण्यापर्यंत मजल गेली. पेपरफुटीचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोटेगावकर यांना अटक करण्यात आली होती.

Deepak Kulkarni

Latur News: देशभरात खळबळ उडवलेल्या 'नीट'पेपर फुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी व आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तसेच सीबीआय यांच्या पेपरफुटी प्रकरणात दिवसागणिक धक्कादायक खुलासे समोर येत आहे.

सीबीआयकडून सध्या NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून वेगानं सुरू आहे. आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरची नीटचा पेपर फोडण्यापर्यंत मजल गेली. पेपरफुटीचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोटेगावकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह लातूरमधील काही डॉक्टर,पालक आणि विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. याचदरम्यान, मोटेगावकर कुटुंबाला राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं सर्वात मोठा धक्का दिला आहे.

नीट-युजी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहोचले होते.आता याचप्रकरणी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने 'आरसीसी कोचिंग क्लासेस'चे संचालक आणि रसायनशास्त्राचे शिक्षक शिवराज मोटेगावकर यांचा मुलगा आदित्य मोटेगावकर याच्यावर दोन वर्षांसाठी नीट परीक्षेत बसण्यास बंदी घातली आहे. तसेच त्याची नीट युजी 2026 ची उमेदवारीही रद्द करण्यात आली आहे.

नीट-युजीच्या 3 मे 2026 रोजी पार पडलेल्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा प्रकरणी आदित्य मोटेगावकरवर प्रश्नपत्रिका मिळवल्याचा किंवा ती शेअर केल्याचा तपासयंत्रणांना संशय आहे. याच धर्तीवर एनटीएकडून आदित्य मोटेगावकर याला कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती.

आदित्य मोटेगावकरनं त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने याउलट एनटीएनकडेच पुरावे आणि सीबीआयची तपासाची माहिती मागितली होती. मात्र, याप्रकरणी अखेर आदित्य मोटेगावकरला राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं मोठा दणका दिला असून नीट युजी 2026 सह 2027 च्या परीक्षेसही त्याला मुकावे लागणार आहे.

आदित्यचे वडील शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाइलमध्ये सीबीआयच्या हाती रसायनशास्त्राच्या 132 लिखित प्रश्नांचे फोटो आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यापैकी तब्बल 111 प्रश्न एनटीएनच्या प्रश्नसंचाशी हुबेहूब जुळल्याचं तपास यंत्रणेनं न्यायालयात म्हटलं आहे. पेपरफुटी प्रकरणानंतर 20 जून रोजी घेण्यात आलेल्या पुनर्परीक्षेचा आदित्य मोटेगावकरचा निकालही एनटीएननं आपल्याकडे राखून ठेवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT