Tamil Nadu Govt: मुख्यमंत्री विजय यांचा मास्टरस्ट्रोक,लाखो शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय; पीक कर्जवसुली थांबवण्याचे आदेश अन् नवीन कर्ज...

CM Thalpathy Vijay Decision : मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय (थलपती विजय) यांनी तमिळनाडू राज्याचा कार्यभार स्विकारल्यापासून अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत.आता त्यांनी तमिळनाडू राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा ठरणारा निर्णय घेतला आहे.
Tamil Nadu Chief Minister Vijay Farmers Decision
Tamil Nadu Chief Minister Vijay Farmers Decision Sarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu News: मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय (थलपती विजय) यांनी तमिळनाडू राज्याचा कार्यभार स्विकारल्यापासून अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत.आता त्यांनी तमिळनाडू राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा ठरणारा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री थलपती विजय यांनी तमिळनाडू राज्यातील सहकारी बँका आणि संस्थांना शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या पीक कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. याचवेळी त्यांनी पात्र शेतकऱ्यांना नवे कृषी कर्ज वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचनाही दिल्या आहेत.

तमिळनाडूतील शेतकरी सध्या हवामान बदल,पाण्याची तीव्र टंचाई,कर्जाचा वाढता बोजा आणि शेतीचा वाढणारा खर्च यांसारख्या गंभीर समस्यांशी संघर्ष करत आहेत. राज्यातील शेतीमालाचे कोसळलेले भावांमुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे.

तमिळनाडूच्या किनारी भागांना लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये सातत्याने येणारी चक्रीवादळं आणि अतिवृष्टीचा तडाखा बसत असून शेतातील उभी पिके वाहून जात आहेत. पावसाची अनिश्चितता वाढल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे तेथील शेतकरी वर्गाला वर्षातून दोन-तीन ऐवजी एकच पीक घेणं शक्य होत आहे. त्यामुळे तमिळनाडूमधील शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.

Tamil Nadu Chief Minister Vijay Farmers Decision
Bjp News : भाजपने भाकरी फिरवली! महाराष्ट्रातील दोन नेत्यांवर उत्तर प्रदेशची काबिज करण्याची जबाबदारी

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या नेतृत्वातील तामिळनाडू सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्याच्या सहकार विभागानं सर्व प्रादेशिक सहनिबंधक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पीक कर्ज सक्तवसुलीची कारवाई तातडीनं थांबवण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री थलपती विजय यांनी दुसरीकडे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मंजूर करून त्याचं वितरण करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. याविषयीच्या सूचनाही सर्व सहकारी संस्था आणि बँकांना देण्यात आल्या आहेत. विशेषतः जुन्या कर्जाची परतफेड केलेल्या किंवा कर्ज मिळण्यास विलंब होत असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

Tamil Nadu Chief Minister Vijay Farmers Decision
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला थेट इशारा; म्हणाले"...तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही!"

तमिळनाडू सरकारने यापूर्वी अल्प भूधारक आणि लघु शेतकऱ्यांसाठी 75 हजार रुपयांपर्यंतचं सरसकट पीक कर्जमाफी जाहीर केली होती.यात 13.34 लाख शेतकऱ्यांचे 5267 कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्यात आलं आहे. ज्या शेतकऱ्यांना अंशतः कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांविरुद्धच अनेक सहकारी संस्था कठोर वसुलीसाठी तगादा लावला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतरच मुख्यमंत्री विजय यांनी हा नवीन आदेश जारी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com