Ambadas Danve News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : शिवसेनेत नवे नेतृत्व तयार, गद्दारांकडे ढुंकूनही पाहणार नाही..

Marathwada Political News : पक्ष फुटीनंतर राज्याचा दौरा केला, पण कुठेही शिवसेनेची ताकद, उद्धव ठाकरेंचा करिश्मा कमी झाल्याचे दिसले नाही.

Jagdish Pansare

Shivsena (UBT) News : शिवसेनेला सोडून गेलेल्या गद्दारांची आता आम्हाला गरज नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेचे नवे नेतृत्व निर्माण झाले आहे, त्यामुळे जे गेले त्यांची घरवापसी नाहीच. (Ambadas Danve News) गद्दारांकडे आम्ही ढुंकूनही पाहणार नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटातील काही मंत्री आमदारांच्या ठाकरे गटात येण्याच्या चर्चा फेटाळल्या. दानवे `सरकारनामा`शी बोलत होते.

राज्यातील सद्यस्थिती, इंडिया या देशपातळीवरील आघाडीसह विविध प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीचा येणाऱ्या काळात काय परिणाम होईल, या प्रश्नावर उत्तर देतांना दानवे म्हणाले, राज्याच्या राजकारणात काहीही घडू शकते हे जरी खरे (Marathwada) असले तरी शिवसेनेतून फुटून बाहेर गेलेल्या गद्दारांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही.

पक्ष फुटीनंतर राज्याचा दौरा केला, पण कुठेही शिवसेनेची ताकद, (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंचा करिश्मा कमी झाल्याचे दिसले नाही. पक्षात पडलेल्या फुटीनंतर आम्ही राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, मतदारसंघात नवे नेतृत्व निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळे हा ठाकरे गटाकडे पुन्हा येणार, तो प्रवेश करणार या सगळ्या वावड्या आहेत. अशी कुठलीही शक्यता नाही, शिवसेना आता गद्दारांकडे ढुंकूनही पाहणार नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काल जो प्रकार झाला तो संतापतून झाला. पालकमंत्री मनमानी पद्धतीने काम करत आहेत. आम्ही सत्तेत होते, पण विरोधी पक्षाच्या आमदारांन निधीच द्यायचा नाही, असे आमच्या पालकमंत्र्यांनी कधी केले नाही. मी आमदार म्हणून आणि त्याआधी जिल्हाप्रमुख म्हणून देखील चार पालकमंत्र्यांचे काम पाहिले आहे. त्याकाळात सत्ताधारी आमदाराला तीन कोटीचा निधी दिला, तर विरोधी आमदाराला दोन कोटी दिले जायचे.

परंतु आताच्या सरकार आणि त्यांच्या पालकमंत्र्यांनी विरोधी आमदारांना निधीच न देण्याचा चुकीचा आणि संताप आणणारा पायंडा सुरू केला आहे. राज्यातील ९० असे मतदारसंघ आहेत, ज्या ठिकाणी या सरकारने विकासनिधी दिलाच नाही. टक्केवारीत हे प्रमाण काढले तर राज्याचा ३३ टक्के भाग हा या सरकारने विकासापासून वंचित ठेवला आहे. कालच्या बैठकीत जो प्रकार घडला तो या असमान निधी वाटपातूनच घडल्याचे दानवे यांनी सांगितले.

अजित पवार सत्तेत आले तेव्हाच त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दोन टप्प्यात शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले होते. मी सभागृहात देखील हे सांगितले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या भाषणात याची कबुली दिली. मग अशा प्रमाणे फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाच निधी दिला जात असेल तर ते कसे सहन करायचे? असा सवाल देखील दानवे यांनी केला.

पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. कायदा व सुव्यवस्था, राज्यातून बाहेर जाणारे उद्योग, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, कांद्याचे अनुदान, माथाडी कामगार कायद्यासारखे विषय लावून धरले. आमच्या दबावामुळेच सरकारला माथाडी कामगार कायदा मागे घ्यावा लागला. पण बहुमताच्या जोरावर हे सरकार मनमानी करत आहे. हे सरकार निर्ढावलेले आहे, अशी टीकाही दानवे यांनी यावेळी केली.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT