Sanjay Shirsat On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या ट्विटवर सरकार चालत नाही ; मुख्यमंत्र्यांना सगळं कळतं..

Shivsena News : निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार एनडीएमध्ये आले तर नवल वाटायला नको.
Aditya Thackeray-Sanjay Shirsat
Aditya Thackeray-Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : मुंबईतील बेस्ट कामगारांच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. गतिमान सरकारचे शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. (Shirsat On Thackeray News) एखाद्या गोष्टीचा योगायोग असतो, कावळा बसायला आणि फांदी तुटायला, पण त्यामुळे आदित्य ठाकरेंना जर असं वाटतं असेल की त्यांनी ट्विट केलं आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन बेस्ट कामगारांच्या प्रश्नात लक्ष घातले. तर त्यांना त्या गैरसमजात राहू द्या.

Aditya Thackeray-Sanjay Shirsat
Ambadas Danve On Shelar: मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतोय; शेलारांच्या टीकेवर दानवेंचा हल्ला..

कोणत्यावेळी काय निर्णय घ्यायचा हे मुख्यमंत्र्यांना समजते, अशा शब्दात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) दाव्याची खिल्ली उडवली. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून होत असलेल्या टीकेलाही उत्तर दिले. उद्धव ठाकरे आधी आमच्यावर टीका करतांना गद्दार, पन्नास खोके हे शब्द वापरत होते. आता ते बाजूला पडले आणि आता आम्हाला ते सडके आंबे म्हणत आहेत.

उद्धव ठाकरे यांना काही काम नसल्यामुळे ते सातत्याने टोमणे मारत असतात. खरतर त्यांच्या टोमण्यांचा संग्रह केला पाहिजे, असा चिमटा देखील शिरसाट यांनी काढला. (Shivsena) शरद पवार यांनी `मी एनडीए सोबत जाणार नाही`, असा विश्वास महाविकास आघाडी आणि देशपातळीवर होत असलेल्या `इंडिया` तील घटक पक्षांना दिला. यावर शरद पवार यांच्या या दाव्यावर विश्वासच ठेवता येणार नाही. जेव्हा ते एनडीएसोबत जाणार नाही, असे सांगतात तेव्हा त्याचा उलटा अर्थ घ्यावा लागतो.

त्यांचे आतापर्यंतचे राजकारण पाहिले तर त्यांनी नेहमीच आपल्या विधानाच्या विरुद्धच भूमिका घेतली आहे. अजून निवडणुकीला वेळ आहे, त्यामुळे सध्या हा विषय चघळण्यात अर्थ नाही. बहुतांश राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली आहे, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार एनडीएमध्ये आले तर नवल वाटायला नको, असेही शिरसाट म्हणाले. मंत्रीमंडळ विस्तारात आता मी लक्ष देत नाही, तो कधी होणार? होणार की नाही? याबद्दल तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा, असे म्हणत त्यांनी मंत्रीमंडळ विस्ताराचा प्रश्न टोलवला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com