Dharashiv News: लोकसभा निवडणूक अवघ्या आठ-नऊ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात पडलेल्या फुटीमुळे राज्यातील तसेच मराठवाड्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. त्यामुळे ज्या लोकप्रतिनिधीने विकासकामे केली तेच तरणार, असे बोलले जाते.
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimabalkar) यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. (Shivsena) शिवसेनेचे बहुतांश खासदार हे शिंदेसोबत गेले असले तरी ओमराजे हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. मतदारसंघात लोकप्रिय असलेल्या ओमराजेंचा सामना येणाऱ्या निवडणुकीत कोणाशी होतो? हे अद्याप स्पष्ट नसले तरी त्यांनी मात्र तयारी सुरू केली आहे.
मी खासदार म्हणून निवडून आल्यापासून अखंडपणे लोकांचे कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. (Osmanabad) हीच माझ्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची शिदोरी आहे. काही लोक निवडणूक आली म्हणून लोकांना विकासाची अमिष दाखवतात.
पण प्रामाणिकपणे लोकांची कामे केली तर त्या कामाचा परतावा लोक प्रामाणिकपणे करतात, असा विश्वास ओमराजे व्यक्त करतात. मतदासंघात विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भेटीगाठी दरम्यान ओमराजे मतदारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना दिसत आहेत.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.