Dead Upsarpanch Govind Barge and Pooja Gaikwad sarkarnama
मराठवाडा

Beed Crime : मयत माजी उपसरपंच बर्गे प्रकरणात धक्कादायक वळण, भाच्यापाठोपाठ आता मित्राचाही नवा गौप्यस्फोट; म्हणाला, 'नर्तकी पूजाने त्यांना...'

New twist in the Barge death case : गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली. यानंतर खळबळ उडाली असतानाच बर्गे यांच्या भाच्याने धक्कादायक दावा केला होता. त्यापाठोपाठ आता बर्गे यांच्या एका मित्राने देखील दावा केला आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात मित्र चंद्रकांत शिंदे यांनी धक्कादायक दावा केला.

  2. त्यांनी सांगितले की, बर्गे यांनी पूजाला कला केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये दिले होते.

  3. सासुरे येथे घर बांधण्यासाठी देखील त्यांनी आर्थिक मदत केली होती.

  4. पूजाकडून सतत धमक्या व पैशांचा तगादा होत असल्यामुळे बर्गे मानसिकदृष्ट्या खचले होते.

  5. या नव्या खुलाशामुळे बर्गे आत्महत्या प्रकरणात आणखी ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Beed News : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांनी बंदुकीतून गोळी झाडून स्वत:ला संपवले होते. यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत कला केंद्रातील 21 वर्षीय नर्तकी पूजा गायकवाडला अटक केली. ज्यात या नर्तिकेशी उपसरपंच गोविंद बर्गे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती समोर आली होती. याचवेळी बर्गे यांच्या भाच्याने माझा मामा निर्व्यसनी होता, त्यांच्याकडे पिस्तुलही नव्हते, त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर आता बर्गे यांच्या मित्राने देखील धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी ट्वीस्ट निर्माण झाला आहे.

मयत बर्गे यांचा सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात त्याच्यांच कारमध्ये मृतदेह सापडला होता. त्यांच्या गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या. तर त्यांनी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. धक्कादायक म्हणजे घटना नर्तकी पूजा गायकवाडच्या घरासमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत घडली होती. त्यावरून आता बर्गे यांच्या घरच्यांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान बर्गे यांच्या भाच्याने माझा मामा निर्व्यसनी होता, त्यांच्याकडे पिस्तुलही नव्हते, त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या गाडीत दारूच्या बाटल्या टाकण्यात आल्या. ही आत्महत्या नसून मला घातपाताचा संशय येत असल्याचा दावाही केला होता. यानंतर आता बर्गे यांच्याबाबत आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. बर्गे यांनी मित्र चंद्रकांत शिंदे यांच्याकडे अनेकदा आपण पूजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तिने नकार दिल्याने ते निराश झाल्याचे सांगितले होते. तसेच पुजाकडून येणाऱ्या धमक्या आणि सततच्या पैशांच्या तगाद्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या खचल्याचेही ते म्हणाले होते. बर्गे यांनी पूजाला स्वत:चे कला केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये दिले होते. सासुरे येथील घर बांधण्यासाठीही पैसा पुरवला होता, असाही दावा बर्गे यांचे मित्र चंद्रकांत शिंदे यांनी केला आहे.

भाच्याने काय केला होता दावा?

बर्गे यांच्या भाच्याने माझा मामा निर्व्यसनी होता, त्यांच्याकडे पिस्तुलही नव्हते, त्याला बदनाम करण्याचा हा कट आहे. ही आत्महत्या नसून हा घातपात आहे. माझे मामा सहा महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होते. गेवराई येथील प्लॉट नावावर करून देण्यासाठी नर्तकी पूजाने त्यांना ब्लॅकमेल करणे सुरू केले होते.

फिर्यादीत नेमकं काय?

मयत बर्गे यांच्या आत्महत्येनंतर लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत ‘गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख 2024 मध्ये तुळजाभवानी कला केंद्र, पारगाव येथे झाली. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. यानंतरच पूजाने वारंवार गोविंदकडे पैशांची मागणी करत त्याला मानसिक त्रास दिला.

दीड वर्षांच्या कालावधीत बर्गेकडून पूजाने आयफोन आणि महागडे सोन्याचे दागिने, बुलेट मोटारसायकल, सोने-नाणी, प्लॉट, नातेवाइकांच्या नावे शेतजमीन देखील करून घेतली. प्लॉट देखील घेतला. यानंतर तिने गेवराईत बांधलेले नवीन घर नावावर यासाठी तगादा लावला. पण बर्गे झुकत नाही म्हटल्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिल्याचे या फिर्यादीत म्हटलं आहे. पूजाला अटक झाली असून आता तिची चौकशी सुरू आहे.

FAQs :

1. गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा कोणाचा आहे?
बर्गे यांचे मित्र चंद्रकांत शिंदे यांनी धक्कादायक दावा केला आहे.

2. बर्गे यांनी पूजाला किती पैसे दिले होते?
सुमारे आठ लाख रुपये दिल्याचा दावा केला आहे.

3. पैसे कुठल्या कारणासाठी दिले होते?
कला केंद्र सुरू करण्यासाठी आणि घर बांधण्यासाठी पैसे दिल्याचे सांगितले गेले आहे.

4. मित्राने कोणते आरोप केले आहेत?
धमक्या, पैशांचा तगादा आणि मानसिक छळ यामुळे बर्गे खचले होते, असे त्यांनी सांगितले.

5. या प्रकरणाचा तपास कुठे सुरू आहे?
बीड पोलिसांकडून या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT