Beed Crime News : माझ्या मामाला बदनाम करण्याचा प्रयत्न; तो निर्व्यसनी, त्याचाकडे पिस्तुलही नव्हते! भाचाच्या दाव्याने संशय बळावला..

New twist in the Barge death case as a fresh claim states that Barge had no pistol and was completely addiction-free. : माझे मामा सहा महिन्यांपासून मानसिक तणावात होते. गेवराई येथील प्लॉट नावावर करून देण्यासाठी संबंधित महिलेकडून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते.
Deputy Sarpanch Shot Dead In Solapur District News
Deputy Sarpanch Shot Dead In Solapur District NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : माझा मामा निर्व्यसनी होता, त्यांच्याकडे पिस्तुलही नव्हते, त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या गाडीत दारूच्या बाटल्या टाकण्यात आल्या. ही आत्महत्या नसून मला घातपाताचा संशय येत असल्याचा दावा मृत गोविंद बर्गे यांच्या भाचाने केला आहे. कला केंद्रातील नर्तिकेशी असलेल्या प्रेम प्रकरण आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणातून बर्गे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता.

परंतु कालपासून पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर पूजा गायकवाड या नर्तिकेशी उपसरपंच गोविंद बर्गे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती समोर आली होती. (Beed News) बर्गे यांचा सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात आपल्याच कारमध्ये मृतदेह सापडला होता. बंदुकीतून गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. 21 वर्षीय नर्तिका पूजा गायकवाडविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर गोविंद बर्गेच्या नातेवाईकांकडून विविध आरोप पूजावर केले जात आहेत. माझ्या मामाकडे पिस्तूल नव्हते, मामा निर्व्यसनी होता या घटनेतून त्याला बदनाम करण्यात येत असल्याचा दावा उपसरपंचाच्या भाचाने केला आहे. (Crime) बीडच्या गेवराई तालुक्यातील लुकामसला गावाचे उपसरपंच बर्गे यांचा सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात नर्तकीच्या घरासमोर गाडीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.

Deputy Sarpanch Shot Dead In Solapur District News
Beed Crime Video : नर्तिकीच्या नादात जीव गमावला! बीडच्या माजी उपसरपंचाची गोळी झाडून आत्महत्या

माझे मामा सहा महिन्यांपासून मानसिक तणावात होते. गेवराई येथील प्लॉट नावावर करून देण्यासाठी संबंधित महिलेकडून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते, असा आरोप करताना सहा महिन्यात घडलेल्या घडामोडीच भाचाने एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितल्या. हत्या प्रकरणानंतर त्यांची बदनामी केली जात असून राजकारणातल्या व्यक्तींनीच त्यांची ओळख महिलेसोबत करून दिली. केवळ पैसे काढण्यासाठी संबंध जुळवून देण्यात आले. त्यामुळे, आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी उपसरपंचाच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे.

Deputy Sarpanch Shot Dead In Solapur District News
Beed Crime News : बीड जिल्ह्यातील उपसरपंचाचा संशयास्पद मृत्यू ; डोक्यात गोळी घुसलेला मृतदेह कारमध्ये आढळला..

पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड तणावात होते. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com