nilnga news  Sarkarnama
मराठवाडा

Nilanga News : भाजप उमेदवाराचा अवघ्या वीस मतांनी पराभव, पण मतदारांचे आभार मानण्यासाठी वाजत-गाजत काढली रॅली!

BJP candidate Kishor Langote News : निलंगा नगरपालिकेत अवघ्या वीस मतांनी पराभूत झालेल्या भाजपच्या किशोर लंगोटे यांनी मात्र मोठ्या मनाने पराभव स्वीकारला.

सरकारनामा ब्युरो

राम काळगे

BJP Local Body News : निवडणुकीत पराभूत झालेले अनेक उमेदवार हे निवडून आलेल्या पक्षावर राग काढतात. हा राग कधी कधी इतका टोकाचा असतो की विजयी उमेदवार, त्याच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचे प्रकारही घडतात. निलंगा नगरपालिकेत अवघ्या वीस मतांनी पराभूत झालेल्या भाजपच्या किशोर लंगोटे यांनी मात्र मोठ्या मनाने पराभव स्वीकारला. एवढेच नाही तर ज्या मतदारांनी मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी ते वाजत-गाजत प्रभागत गेले आणि हात जोडत त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.

किशोर लंगोटे यांच्या या खिलाडू वृत्तीची तालुक्यात चर्चा होत आहे. मी पराभूत झालो असलो तरी जनतेच्या सेवेत कायम राहणार असल्याचा विश्वास ते या आभार रॅलीतून देताना दिसत आहेत. निलंगा नगरपालिकेचा निकाल रविवारी जाहीर झाला.

भाजपने (BJP) नगराध्यक्षासह सर्वाधिक नगरसवेक निवडून आणत सत्ता कायम राखली. तर काँग्रेस पक्षाच्या जागाही वाढल्या. या जय-पराजयाचे मंथन, चिंतन सुरू असतानाच भाजपच्या एका अवघ्या वीस मतांनी पराभूत झालेल्या उमेदवाराच्या कृतीने सगळ्याच राजकीय पक्षांसाठी एक आदर्श घालून दिला आहे.

पराभवातून खचून न जाता ज्यांनी आपल्याला मतदान केले त्यांचे आभार फक्त बॅनरबाजी किंवा सोशल मिडियावर पोस्ट टाकून न मानता किशोर लंगोटे यांनी घरोघरी जाऊन मतदारांसमोर हात जोडले. निलंगा नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 1 मधून लंगोटे यांचा फक्त 20 मतांनी पराभव झाला. अत्यंत चुरशीच्या या लढतीत तिथे काँग्रेस उमेदवाराने बाजी मारली. थोडक्यात झालेला हा पराभव लंगोटे यांनी मोठ्या मनाने स्वीकारला.

आपल्यावर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी रविवारी त्यांनी प्रभागात आभार रॅली काढली. 'नगरसेवक झालो नसलो तरी जनतेचा जनसेवक म्हणून कायम काम करत राहीन' असा विश्वास ते आपल्या मतदारांना देत आहेत. पराभवातही सकारात्मक भूमिका घेत समाजसेवेचा मार्ग स्वीकारणाऱ्या किशोर लंगोटे यांच्या भूमिकेचे शहरात कौतुक होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT