BJP Congress clash Nilanga Sarkarnama
मराठवाडा

 Nilanga Local Body Election : नगरपरिषदेची निवडणूक स्थगित होताच कट्टर विरोधकांचा रडीचा डाव! देशमुख-निलंगेकरांच्या कार्यकर्त्यांची 'फाडाफाडी'...

Amit Deshmukh vs Sambhaji Nilangekar : नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी लावलेल्या काँग्रेस आणि भाजपच्या बॅनरवर एकमेकांच्या कार्यकर्त्यांनी राग काढत असल्याचे दिसून आले.

Jagdish Pansare

Nilanga political clash : निलंगा नगरपरिषदेची निवडणूक ऐनवेळी स्थगित केल्यानंतर शहरात काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष भडकला आहे. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी हा भाजपचाच डाव असल्याचा आरोप केला. जनमत आपल्या विरोधात असल्याचे लक्षात येताच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपनेच हा रडीचा डाव टाकला, असेही अमित देशमुख यांनी म्हटले होते.

माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे हे आरोप खोडून काढत निवडणुकीला स्थगिती कोणत्या कारणांमुळे मिळाली याबद्दल सविस्तर माहिती माध्यमांना दिली. परंतु काँग्रेस आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक स्थगितीच्या निर्णयापासून खटके उडत आहेत.

नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी लावलेल्या काँग्रेस आणि भाजपच्या बॅनरवर एकमेकांच्या कार्यकर्त्यांनी राग काढत असल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी बॅनर फाडण्यात आल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सोशल मीडियावरही काँग्रेस- भाजपचे कार्यकर्ते भिडले असून निलंगा नगरपालिकेची निवडणूक स्थगित झाल्याबद्दल एकमेकांना दुसणे देत आहेत.

सोशल मिडियावर काँग्रेसचे कार्यकर्ते निलंग्यात आतापर्यंत आमच्या पक्षाची अनेक बॅनर फाडली आहेत. परंतु कुठलातरी एक व्हिडिओ टाकून आम्हाला आपली बदनामी करायची नाही. आपण अगोदरच खूप बदनाम आहात, पुन्हा तुम्हाला बदनाम करायची आम्हाला हौस नाही, असे म्हणत भाजपवर थेट निशाणा साधला आहे.

यावर भाजपकडूनही काँग्रेसकडून बॅनर फाडत शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. असे प्रकार होणार असतील तर निलंग्याची जनता आपल्याला मतदान कसं करणार? असा सवाल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना करत आहेत. हा रडीचा डाव आहे, असे म्हणत बॅनर फाडले पण निलंगेकरांच्या मनातून प्रतिमा कशी मिटवणार? असा पलटवार भाजपकडून करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT