Amit Deshmukh-Ashok Patil Nilangekar News Sarkarnama
मराठवाडा

Nilanga Assembly Constituency: निलंगेकरांनी अपक्ष अर्ज भरला, अमित देशमुख मनधरणी करणार!

Nilangekar Files Independent Nomination: दुसरीकडे अमित देशमुख यांनीच अशोक पाटील निलंगेकर यांची उमेदवारी कापली, असा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. याआधीच्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अशोक पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांच्या पराभव झाला.

Jagdish Pansare

राम काळगे

निलंगा: विधानसभेच्या निलंगा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी अखरे बंडाचे निशाण फडकावलेच. आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत त्यांनी विरोधक तसेच स्वपक्षाचे अधिकृत उमेदवार अभय सोळुंके यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे (Congress) अधिकृत उमेदवार अभय सोळुंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या माजी मंत्री अमित देशमुख यांनी आपण स्वतः अशो पाटील निलंगेकर यांची मनधरणी करणार आहोत, असे म्हटले आहे. आज अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर उद्याही ते मोठे शक्तीप्रदर्शन करत दुसरा अर्ज दाखल करणार आहेत.

अशोकराव पाटील यांना डावलून काँग्रेने अभय सोळुंके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर निलंगेकर काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. समर्थकांसह निष्ठावंत निलंगेकर गटाची बैठक बोलावत त्यांनी चर्चा केली होती. त्यानंतर आज मुहूर्त साधत निलंगेकर यांनी अर्ज दाखल करत बंडखोरीच्या दिशने पाऊल टाकले आहे.

दरम्यान, या बंडावर माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी भाष्य केले. निलंग्याच्या उमेदवारी बाबतचा निर्णय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने घेतला आहे. अशोक पाटील निलंगेकर यांची आम्ही मनधरणी करत आहोत. काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजी काळगे दोन दिवसात त्यांच्याकडे जाऊन बोलतील. त्यानंतर मी सुद्धा स्वतः अशोक पाटील निलंगेकर यांच्याकडे जाणार आहे, असे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे अमित देशमुख यांनीच अशोक पाटील निलंगेकर यांची उमेदवारी कापली, असा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. याआधीच्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अशोक पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांच्या पराभव झाला.

सहा महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार डाॅ. शिवाजी काळगे यांना मात्र निलंगा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस निलंगेकर यांना पुन्हा उमेदवारी देईल, अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती. मात्र काँग्रेसने भाकरी फिरवत अमित देशमुख समर्थक अभय सोळुंके यांना उमेदवारी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT