Shivsena UBT : शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणाऱ्या पहिल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नव्याने मोट बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचयात समिती, नगरपरिषद आणि त्यानंतर होणार्या महापालिका निवडणुकींसाठी संपूर्ण संघटनात्मक रचनाच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात 'सरकारनामा'ला सविस्तर माहिती दिली.
कोरोना आणि त्यानंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी या सगळ्या कालावधीत संघटनात्मक घडी विस्कटली होती. आमचीच नाही तर सर्वच पक्षांची ही स्थिती आहे. (Shivsena) त्यानंतर पुन्हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लागल्याने ग्रामीण भागातील शिवसैनिकांशी म्हणावा तसा संवाद साधता आला नाही. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने 'निष्ठावंत शिव संपर्क मोहीम' च्या माध्यमातून नव्याने पक्षाची बांधणी करण्याचा प्रयत्न आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गट, गण, पंचायत समिती, नगर पालिका आणि शहरी भागातील महानगर पालिका क्षेत्रात तीन टप्प्यात आम्ही ही मोहीम राबवणार आहोत. (Ambadas Danve) यात जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना भेटून त्यांचा योग्य सन्मान राखत नव्या तरुण कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके, जिल्हा परिषेदेचे 63 सर्कल, 124 गट आणि शहरातील महापालिकेचे 115 वार्डात ही निष्ठावंत शिवसंपर्क मोहीम आम्ही राबवणार आहोत. या माध्यमातून सिल्लोड आणि फुलंब्री या दोन तालुक्यात हे काम आम्ही अनुक्रमे 50 आणि 70 टक्के पूर्ण करू.
उर्वरित तालुके आणि शहरातील तीनही मतदारसंघांमध्ये 90 टक्के काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यासाठी तीन स्तरावर टीम तयार करण्यात आल्या आहेत. गटप्रमुख, शाखा प्रमुख, बीएलए अशी रचना यासाठी तयार करण्यात आली आहे. बीएलए हा मतदार यादीच्या दृष्टाने अत्यंत महत्वाचा घटक असल्याने त्यावर आम्ही अधिक भर देणार आहोत. या मोहिमेचा भाग म्हणूच आजचे प्रशिक्षण शिबीर आहे. दिवाळी पर्यंत तीन टप्प्यात ही मोहीम पूर्ण करून आवश्यक त्या नियुक्त्या करून आम्ही निवडणुकीसाठी सज्ज होणार आहोत.
तीन टप्प्यात निष्ठावंत शिव संपर्क मोहीम पूर्ण केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक महाशिबीर घेऊन संघटनात्मक बांधणी, आढावा, झालेल्या कामाचे मुल्यमापन या सगळ्या गोष्टींचा यामध्ये उहापोह केला जाईल. या निमित्ताने जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. निष्ठावंत शिवसैनिकांचा अनुभव आणि नव्या तरूण कार्यकर्त्यांची सांगड घालत येणाऱ्या सर्व निवडणुकीत आम्ही जोरदार मुसंडी निश्चित मारू शकतो, असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.