Shivsena UBT Politics: महापालिका खड्डे बुजवेना, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आता थेट गणरायालाच साकडे!

Shiv Sena UBT news :शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने गणेशोत्सवात शहरवासीयांची समस्या कल्पकतेने मांडली

Uddhav thackeray
Uddhav thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. शहरवासी यामुळे त्रस्त आहेत. सत्ताधारी आमदारांपासून तर विरोधी पक्षांनीही आंदोलन केले. मात्र महापालिका दाद देत नसल्याचे चित्र आहे. शहरातील महामार्गासह सर्व प्रमुख रस्ते आणि कॉलनी रस्ते गुणवत्तापूर्ण नसल्याने वाहून गेले आहेत. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी प्रचंड खड्डे झाले आहेत. रोज होणाऱ्या अपघातात अनेक नागरिक जायबंदी झाले. महापालिका प्रशासन मात्र यावर मौन बाळगून आहे.

शहरातील रस्ते आणि त्यातील खड्डे याबाबत अनेक नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली. भाजपच्या (BJP) आमदार देवयानी फरांदे यांनी याबाबत दोनदा रस्त्यावर उतरून आंदोलन केले. महापालिका आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केली. मात्र अद्यापही समस्या सुटलेली नाही.


Uddhav thackeray
BJP Politics : उपराष्ट्रपदीपदाच्या उमेदवाराचे नक्षल कनेक्शन, बी सुदर्शन रेड्डी यांच्यावर भाजपचा हल्लाबोल, ठाकरे पवारही टार्गेट

शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)पक्षाने गेल्या महिन्यात याबाबत धडक मोहीम राबवली. त्याच्या सर्व भागातून खड्ड्यांचे फोटो काढून ते महापालिकेच्या तक्रार बॉक्समध्ये ऑनलाईन नोंदवले. महापालिका आयुक्तांची भेट घेऊन खड्डे बुजवण्याबाबत शिवसेना स्टाईल इशारा देखील दिला होता.


Uddhav thackeray
Vice President Election: पुणेकरांचा काही नेम नाही! पठ्ठ्याने दिल्लीत जाऊन भरला उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवारी अर्ज

एवढे सगळे होऊनही महापालिकेकडून मात्र नागरिकांचे समाधान होईल, असे खड्डे बुजवण्याचे काम झालेले नाही. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने त्यावर शक्कल लढवली आहे. प्रभाग क्रमांक 23 येथील गर्जना युवा प्रतिष्ठान तर्फे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रवीण जाधव यांनी प्रभागात ठिकठिकाणी फ्लेक्स झळकवले आहेत. त्यात प्रभागातील खड्ड्यांचे फोटो आहेत. खड्ड्यांबाबत नागरिकांची गैरसोय दूर कर असे साकडे त्यांनी गणरायाला घातले आहे.


Uddhav thackeray
Sharad Pawar : मतदारयाद्या मॅनेज, प्रभाग रचना सरकारपुरस्कृत : शरद पवारांसह संपूर्ण पक्षाचाच राहुल गांधींच्या सुरात सूर

नाशिक शहरातील रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार आहे. रस्त्यांची हमी कंत्राटदार दोन वर्ष देतात. या कालावधीत नादुरुस्त होणारे रस्ते दुरुस्त करणे आणि खड्डे बुजवणे हे कंत्राटदाराचे काम आहे. मात्र, महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग या कंत्राटदारांना पाठीशी का घालते? असा गंभीर प्रश्न नागरिकांना पडला आहे. आंदोलन करून ही प्रश्न सुटत नसल्याने आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने थेट गणरायाला साकडे घातले आहे. महापालिका पावली नाही अशा स्थितीत गणराया तरी महापालिकेला सदबुद्धी देईल का? याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे.


Uddhav thackeray
Laxman Hake controversy : लक्ष्मण हाकेंचा गेम नेमका कोणी केला? जिवाभावाचे मित्र एकमेकांच्या विरोधात का उभे राहिले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com