Nitin Gadkari  Sarkarnama
मराठवाडा

Nitin Gadkari News : खुद्द नितीन गडकरी ‘ती’ झाडे पाहण्यासाठी आले; पैठणमध्ये ५१ वटवृक्षांचे यशस्वी पुनर्रोपण, देशातील पहिला प्रयोग

सरकारनामा ब्यूरो

Paithan News : पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. रुंदीकरणाच्या कामात जुने आणि विशाल वटवृक्ष आडवे येत होते. ही झाडे तोडण्याऐवजी ती मुळासकट उपटून त्याचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार वनविभागाच्या जागेत पैठण येथे ५१ वटवृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. या झाडांना नवी पालवी फुटली असून प्रयोग यशस्वी झाला. तो प्रयोग पाहण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे स्वतः आले होते. (Nitin Gadkari himself came to see the 51 replanted trees in Paithan)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या प्रयोगाचे कौतुक केले. अभिनेता सयाजी शिंदे, पालकमंत्री संदीपान भुमरे आदी उपस्थित होते. ते म्हणाले की, पैठणमध्ये (Paithan) ५१ वटवृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आल्याची माहिती मला मिळाली. हा देशातील पहिला यशस्वी प्रयोग आहे. तो पाहण्यासाठी मी मुद्दामहून आलो आहे. झाडे लावण्यासह ती वाचविण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. यात सामाजिक, शिक्षण संस्था, विविध संघटनांनी पुढे आले पाहिजे.

सुमारे ५१ वटवृक्षांचे पैठण येथे पुनर्रोपण करण्यात आले आहे. आता ते पुनरुज्जीवीत झाले आहेत. देशातील हा पहिला यशस्वी प्रयोग आहे. वृक्ष लागवड व संवर्धन महत्त्वाचे आहे. त्यासाठी संस्था, संघटनांसह सर्वांनी पुढे यायला हवे.

प्रदूषण मुक्तीसाठी विविध योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. बांबूचे उत्पादामुळे प्रदूषणावर मात करता येते. येत्या काळात केंद्र सरकार बांबू शेतीवर भर देणार आहे. शेतकऱ्यांना उसाला जो भाव मिळतो, त्यापेक्षा जास्त भाव बांबूच्या शेतीला मिळेल, असे गडकरी यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले की, पैठणचा परिसर बघितल्यानंतर सुंदर व प्रसन्न वाटले. येथे नाथसागराचे पाणी व आजूबाजूच्या हिरवेगार दिसणारे दृश्य प्रदूषणावर मात करणारे आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या माध्यमातून येथे ५१ वटवृक्षांचे पुनर्रोपण करण्याचे काम झाले आहे. पैठणला येणारे भाविक व पर्यटक हा वृक्ष पुनर्रोपणाचा प्रयोग पाहून भारावतील. आपल्या गावाकडे गेल्यावर ती हा प्रयोग केल्याशिवाय राहणार नाही.

आईला वृक्ष वाचविण्याचे वचन दिले होते

मी माझ्या आईला वृक्ष वाचवेन, असे वचन दिले होते. त्यानुसार ११ जून २०१६ रोजी वृक्ष वाचविण्याची मोहीम हाती घेतली. माझी आई ९४ वर्षे जगली. आईची ९४ किलो वजनाची वृक्ष बीजतुला केली. ती बीजे लावली. आज बीजाच्या वृक्षातून माझी आई जिवंत असून सावली, फळे, रसात मला ती दिसत आहे. यापुढे रस्ता रुंदीकरणात एकही झाड तोडले जाणार नाही, ती जपली जाणार आहेत. मंत्री नितीन गडकरी यांनी साथ दिल्याने वृक्ष जपण्याची मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT