Yuva Sena News : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल युवा सेनेत एकाकी ; म्हणाले,‘सबको साथ देते देते...मैं खुद अकेला रह गया...’

युवा सेनेतील अंतर्गत कुरघोडीला कंटाळून कनाल हे काही दिवसांपूर्वीच युवा सेनेच्या कोअर कमिटीच्या ग्रुपमधून बाहेर पडले होते.
Rahul Kanal-Aaditya Thackeray
Rahul Kanal-Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : युवा सेनेचे प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी काही दिवसांपूर्वी युवा सेनेच्या ग्रुपमधून बाहरे पडले होते. त्याची चर्चा होत असतानाच आज त्यांची एक फेसबुक पोस्ट आली आहे. त्यात त्यांनी ‘मैं खुद अकेला रेह गया.. सबका साथ देते देते...’ असे सांगून राहुल कनाल हे युवा सेनेत एकटे पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Aaditya Thackeray's close aide Rahul Kanal alone in Yuva Sena)

युवा सेनेच्या (Yuva Sena) कार्यात राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांना खंबीर साथ दिली आहे, त्यामुळे ते आदित्य आणि मातोश्रीचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. शिवसेनेतील बंडानंतरही त्यांनी आदित्य यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, युवा सेनेतील अंतर्गत कुरघोडीला कंटाळून कनाल हे काही दिवसांपूर्वीच युवा सेनेच्या कोअर कमिटीच्या ग्रुपमधून बाहेर पडले होते.

Rahul Kanal-Aaditya Thackeray
Story of Narhari Zirwal's Dance : शरद पवारांचा फोन...पत्नीला खांद्यावर घेऊन डान्स...अन॒ मुंबई दौरा; झिरवळांनी सांगितली ती स्टोरी

काही दिवसांपूर्वी राहुल कनाल यांच्यावर प्राप्तीकर विभागाने (इनकम टॅक्स) त्यांच्यावर छापेमारी केली होती. मात्र, त्यात अधिकाऱ्यांच्या हाती काही लागले नव्हते. मात्र, युवा सेनेत ते काही दिवसांपासून नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. युवा सेनेतील अंतर्गत गटबाजीला ते कंटाळले होते, त्यातूनच त्यांनी युवा सेनेच्या कोअर कमिटीचा व्हॉट्‌स ॲप ग्रुप सोडला होता. त्यानंतर राहुल कनाल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती.

Rahul Kanal-Aaditya Thackeray
Solapur Politic's : मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक, राष्ट्रवादी नेत्याच्या घरी विखे पाटलांची भेट; मोहिते पाटील, सातपुते मैदानावरच रेंगाळले

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी ‘मैं खुद अकेला रेह गया... सबका साथ देते देते..’ असे म्हटले आहे. त्यामुळे राहुल कनाल युवा सेनेमध्ये एकाकी? असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. युवा सेनेत ते नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्यात त्यांच्या एकटेपणाची आज नवी पोस्ट आल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

Rahul Kanal-Aaditya Thackeray
Solapur Shivsena Leader warn BJP : ‘त्या’ लोकांना ताकद देणार असाल तर भाजपने आमच्या मदतीची अपेक्षा ठेवू नये; शिंदे गटाच्या नेत्याने सुनावले

आदित्य ठाकरे यांचे जवळचे असलेले कनाल युवा उद्योजक म्हणून ओळखले जातात. युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत. आदित्य यांच्या कोअर कमिटीतील महत्वाचे सदस्य आहेत. मुंबई महापालिकेत ते स्वीकृत सदस्य आहेत. त्यांची शिक्षण समितीवरही वर्णी लावण्यात आली होती. कनाल हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com