President of Pune Jilha Dudh Sangh: अजितदादांची पसंती भगवान पासलकरांना; कात्रज डेअरीचे अध्यक्षपद प्रथमच दुर्गम वेल्ह्याला

Katraj Dairy: पासलकर यांच्या रुपाने वेल्हे तालुक्यातला प्रथमच कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.
Katraj Dairy :  Bhagwan Pasalkar
Katraj Dairy : Bhagwan PasalkarSarkarnama
Published on
Updated on

Katraj Dairy News : पुणे जिल्हा सहकारी दूध उप्तादक संघाच्या (कात्रज डेअरी) अध्यक्षपदी दुर्गम समजल्या जाणाऱ्या वेल्हे तालुक्यातील ज्येष्ठ संचालक भगवान पासलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पासलकर यांच्या रुपाने वेल्हे तालुक्यातला प्रथमच कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. (Bhagwan Pasalkar was elected unopposed President of Pune Jillha Dudh Sangh )

पुणे (Pune) जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Dudh Sangh) एकूण १६ संचालकांपैकी तब्बल ८ जण इच्छूक असल्याने कात्रज डेअरी (Katraj Dairy) अध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते अजित पवार यांची कसोटी लागली होती. मात्र, पवार यांनी ९ तारखेला सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यातून पासलकर यांना संधी दिली आहे.

Katraj Dairy :  Bhagwan Pasalkar
Yuva Sena News : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल युवा सेनेत एकाकी ; म्हणाले,‘सबको साथ देते देते...मैं खुद अकेला रह गया...’

पुणे जिल्हा दुध उप्तादक संघाच्या अध्यक्षपदाचा केशरताई सदाशिवराव पवार यांनी महिनाभरापूर्वी राजीनामा दिला होता. अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता संपूर्ण पुणे जिल्ह्याला लागली होती. अनेक इच्छुकांच्या मागे त्या-त्या तालुक्यातील आमदार उभे राहिल्याने त्यांचाही आग्रह राष्ट्रवादी पक्षाला दूर्लक्षन चालणार नव्हते.

Katraj Dairy :  Bhagwan Pasalkar
Story of Narhari Zirwal's Dance : शरद पवारांचा फोन...पत्नीला खांद्यावर घेऊन डान्स...अन॒ मुंबई दौरा; झिरवळांनी सांगितली ती स्टोरी

पुण्यातील बारामती होस्टेलवर अजित पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखी घेतल्या, त्यानंतर त्यांनी आज भगवान पासलकर यांची निवड जाहीर केली आहे. पासलकर यांच्या रुपाने बारामती लोकसभा मतदारसंघात दूध संघाचे अध्यक्षपद राहिले आहे.

Katraj Dairy :  Bhagwan Pasalkar
Solapur Politic's : मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक, राष्ट्रवादी नेत्याच्या घरी विखे पाटलांची भेट; मोहिते पाटील, सातपुते मैदानावरच रेंगाळले

दम्यान, आज सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत पक्षादेश आणून वेल्हे तालुक्यातील ज्येष्ठ संचालक भगवान पासलकर यांचे नाव पुढे आहे. अध्यक्षपदासाठी पासलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याचं निवड जाहीर केली. पासलकर हे वेल्हे तालुक्यातील कात्रज संघाचे पहिले अध्यक्ष ठरले आहेत. ही निवड अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याची माहिती कात्रज प्रशासनच्या वतीने देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com